आग्रा किल्ल्यात साजरी होणार यंदाची शिवजयंती

पुरातत्व विभागाने दिली परवानगी

आग्रा किल्ल्यात साजरी होणार यंदाची शिवजयंती

दिल्लीच्या आग्रा किल्ल्यात इतर सांस्कृतिक कार्यक्रम करण्याची परवानगी दिली जाते मग शिवजयंतीलाच का परवानगी मिळत नाही, असा प्रश्न विचारत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती , त्याला आता अखेर पुरातत्व विभागाने परवानगी देण्यात आली आहे. यावर्षी आग्रा किल्ल्यातील ‘ दिवाण-ए-आम ‘  मध्ये शिवजयंती साजरी करायला परवानगी दिली आहे. याआधी शिवजयंती साजरी करायला आग्रा किल्ला परिसरात परवानगी नाकारली होती पण, यावर्षी मिळालेल्या  परवानगीने शिवप्रेमीं आनंद साजरा करत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, विनोद पाटील यांच्या अजिंक्य देवगिरी फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकारकडून आग्रा किल्ला परिसरात यंदा शिवजयंती साजरी केली जाणार असून या कार्यक्रमाला महाराष्ट्र्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत. याशिवाय राज्याचे अन्य मंत्री सुद्धा उपस्थित राहणार असल्याचे बोलले जाते  आहे. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे ११ नोव्हेंबर २०२२ पासूनच परवानगीचे प्रयन्त सुरु होते , पुरातत्व खात्याला याआधी आगाखान पुरस्कार कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आल्याचे सांगण्यात आले शिवाय अदनान सामीच्या एका संगीत कार्यक्रमालासुद्धा परवानगी देण्यात आली होती.

ज्यांचा या किल्ल्याशी कोणताच किंवा ऐतिहासिक संबंध नाही अशांना परवानगी का दिली जाते मग शिवाजी महाराजांच्या जयंतीलाच परवानगी का नाकारली जाते असा सवालच अजिंक्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी केला होता. यानंतर विनोद पाटील यांच्या पाठपुरावयस आता भारतीय पुरातत्व खात्याने आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे फक्त महाराष्ट्र राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात शिवप्रेमी हा आनंद व्यक्त करत आहे.

हे ही वाचा:

बालविवाहाविरोधात हिमंता बिस्व सर्मा का आहेत आक्रमक?

सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात उद्धव ठाकरे-शिंदे गटातील संघर्षावर सुनावणी

पुलावामा हल्ल्यातील जवानांना देशभरातून श्रद्धांजली

पहाटेच्या शपथविधीवरचा पडदा अखेर फडणवीसांनी उघडला; शरद पवार वैतागले

औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज यांना ३५० वर्षांपूर्वी आणि युवराज संभाजी यांना आग्रा इथे नजरकैदेत ठेवले होते त्या दोघांना नजरकैदेत ठेऊन मारण्याचा कटच औरंगजेबाने आखला होता पण, छत्रपती शिवाजी महाराज मोठ्या शिताफीने आजारी पाडण्याचे सोंग घेऊन आग्ऱ्यातून सुखरूप निसटले.  या घटनेला आपल्या इतिहासात एक वेगळेच महत्व आहे म्हणूनच याच किल्ल्यामध्ये शिवजयंतीचा भव्य उत्सव सोहळा साजरा करता यावा, अशी अनेक शिवप्रेमींची इच्छा होतीच ती यावर्षी पूर्ण होत आहे याचे एक वेगळेच समाधान होत आहे.

Exit mobile version