चीनने तैवानवर हल्ला केल्यास जपान आणि अमेरिका शांत राहणार नाहीत. असा इशारा जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दिला आहे.
बुधवारी एका तैवानच्या थिंक टँकने आयोजित केलेल्या मंचावर बोलतांना, आबे म्हणाले, “तैवानवर सशस्त्र आक्रमण जपानसाठी एक गंभीर धोका असेल. तैवान आणीबाणी ही जपानी आणीबाणी आहे. म्हणून जपान-यूएस युतीसाठी आणीबाणी आहे. बीजिंगमधील लोक, विशेषतः राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी हे ओळखण्यात गैरसमज करू नये.” आबे हे सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या सर्वात मोठ्या गटाचे प्रमुख आहेत आणि पक्ष आणि जपानमधील एक अतिशय प्रभावशाली व्यक्ती आहेत.
माजी पंतप्रधान आबे यांचे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा जपानने सध्याच्या १००-२०० किमी क्षमतेच्या १००० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील वस्तूंवर मारा करण्यासाठी आपल्या क्रूझ क्षेपणास्त्रांची क्षमता सुधारण्याचा आणि वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीजने विकसित केलेली ही क्षेपणास्त्रे या दशकाच्या उत्तरार्धात बहु-स्पेक्ट्रम क्षमतेसह तैनात केली जातील. मूलत:, जपानी योजना आशिया पॅसिफिक प्रदेशात वाढलेली क्षेपणास्त्र विकास स्पर्धा रोखण्यासाठी आहे.
जपानचा भूतकाळातील वारसा पाहता चीन आणि दक्षिण कोरिया या क्षेपणास्त्र विकास योजनेमुळे अस्वस्थ होतील परंतु वस्तुस्थिती अशी आहे की बीजिंग या प्रदेशात अति-आक्रमक मोडमध्ये आहे. जपानमधील कोणत्याही शहराला आणि गुआममधील अमेरिकेच्या तळाला लक्ष्य करू शकणारी मध्यवर्ती-श्रेणीची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे यापूर्वीच तैनात केली आहेत.
हे ही वाचा:
ओमिक्रॉनचा भारतात प्रवेश; कर्नाटकमध्ये आढळले ओमिक्रॉनचे दोन रुग्ण
भारतीय ऍप ‘कू’ने मिळवला ‘हा’ सन्मान
भाजपाने सुरू केली मथुरेची तयारी?
उत्तर कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन
वरील बाबींच्या पार्शवभूमीवर, शिन्झो आबे यांचे विधान चीन गांभीर्याने घेऊल. कारण चीनने आशिया पॅसिफिकमध्येही आपला वर्चस्ववादी अजेंडा पुढे रेटत राहिल्यास टोकियो आपला शांततावादी पवित्रा (त्यांच्या राज्यघटनेच्या कलम नऊमध्ये नमूद केलेले) मागे टाकेल हे स्पष्ट होते.