गाझामधील रुग्णालयच हमासच्या दहशतवादी कारवायांचे केंद्र

इस्रायलने जाहीर केला व्हिडीओ

गाझामधील रुग्णालयच हमासच्या दहशतवादी कारवायांचे केंद्र

हमास या दहशतवादी संघटनेच्या कारवायांचा मुख्य तळ गाझा शहरातील शिफा रुग्णालयाखाली असून तेथे अनेक भुयारे आणि भूमिगत चेंबर असल्याचा दावा इस्रायलच्या लष्कराने केला आहे.

गाझा पट्टीतील सर्वांत मोठे रुग्णालय असणारे शिफा रुग्णालयच हमासच्या दहशतवादी कारवायांचे मुख्य केंद्र असल्याचा दावा इस्रायल संरक्षण दलाने (आयडीएफ) केला आहे. रुग्णालयाच्या खाली भूमिगत अनेक इमारती असल्याचा व्हिडीओ आयडीएफने जाहीर केला आहे. इस्रायलचे लष्कर हे शिफा कॉम्प्लेक्सला लक्ष्य करणार असल्याचे वृत्त आल्यानंतर इस्रायलचा हा व्हिडीओ आला आहे. इस्रायलने हवाईहल्ल्यांना सुरुवात केल्यानंतर अनेक विस्थापित नागरिकांनी येथेच आश्रय घेतला आहे.

‘शिफा रुग्णालय हे गाझामधील केवळ सर्वांत मोठे रुग्णालय नव्हे तर ते हमासच्या दहशतवादी कारवायांचे मुख्यालयही आहे. दहशतवादाचा रुग्णालयाशी संबंध नाही. मात्र दहशतवादाचा कोणताही तळ उघड करण्यासाठी आयडीएफ कारवाई करेल,’ अशी प्रतिक्रिया इस्रायलच्या संरक्षण दलाने ‘एक्स’वर दिली आहे.

हे ही वाचा:

ऑस्ट्रेलियाला नमविण्याची नामी संधी न्यूझीलंडने ५ धावांनी गमावली

लॉरेन्स बिश्नोईचा २० वर्षीय दुश्मन योगेश कदियानला इंटरपोलची नोटीस

बद्रुद्दिन अजमल म्हणतात, ‘बलात्कार, लूट, दरोड्यात मुस्लिमांचा पहिला क्रमांक’

एशियन पॅरा गेम्समध्येही भारत ‘अबकी बार १०० की पार’

‘हमास-आयसिस अतिशय क्रूर आहे. त्यांनी रुग्णालयाचे रूपांतर त्यांच्या दहशतवादाच्या मुख्यालयात केले आहे,’ अशा शब्दांत इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी संताप व्यक्त केला. तर, ‘शिफा रुग्णालयातील अनेक अत्यावश्यक गरजा जसे की, इंधन, पाणी आणि वीज यांचा वापर हमासचे दहशतवादी करत आहेत,’ अशी माहिती इस्रायलच्या लष्करातर्फे देण्यात आली.

हजारो दहशतवाद्यांनी लपण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली असल्याचा दावा इस्रायल लष्कराच्या प्रवक्त्याने केला. इस्रायलच्या संरक्षण दलाने शुक्रवारी शिफा रुग्णालय परिसरातील बॉम्ब हल्ल्यांची तीव्रता वाढवली होती. ‘शिफा रुग्णालयात अनेक भूमिगत जागा आहेत, ज्याचा वापर हमासच्या दहशतवादी संघटनेचे नेते करत आहेत. तसेच, तेथूनच ते पुढील कारवायांची सूत्रे हलवत आहेत. रुग्णालयात पोहोचण्यासाठी शेकडो भुयारी मार्ग खोदण्यात आले आहेत. त्यामुळे हमासच्या मुख्यालयात ते सहजच पोहोच शकत आहेत,’ अशी माहिती आयडीएफने दिली.

Exit mobile version