कारुळकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्त्या आणि सिनेप्रेमी शीतल जोशी-कारूळकर यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र महामंडळाच्या (सेन्सॉर बोर्ड) सल्लागार मंडळाच्या सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. कारूळकर यांच्या झालेल्या निवडीचे चित्रपट क्षेत्रातून स्वागत होत आहे.
प्रशांत किशोर संन्यास घेणार की यु टर्न?
‘आता कोर्टालाही महाराष्ट्रद्रोही म्हणणार का?’
मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाइव्हमधून चित्र अस्पष्टच!
सावरकर हे समाजक्रांतीवीर पण होते
शीतलजी सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कारूळकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष असून त्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. आर्क इन्शुरन्सच्या संचालिका म्हणूनही त्या समर्थपणे काम पाहात आहेत. बिमा पाठशालामध्ये महिला सबलीकरणाच्या त्या प्रमुख आहेत. फार्माटेक फिल्टरेशनच्या निर्मितीप्रमुख म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी आहे. शेतीतज्ज्ञ म्हणूनही त्यांची ओळख आहे तसेच रिअल इस्टेट क्षेत्रातही त्या कार्यरत आहेत.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या सल्लागार मंडळाची यादी नुकतीच जाहीर केली. त्यात ११५ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड पुढील दोन वर्षांसाठी असेल.
चित्रपट प्रमाणपत्र महामंडळ १९५२पासून चित्रपटांचे परीक्षण करत आहे. याचे मुख्यालय मुंबईत असून नऊ प्रादेशिक कार्यालये आहेत. त्यात मुंबई, हैदराबाद, नवी दिल्ली, कटक, गुवाहाटी, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, थिरुवनंतपुरम ही प्रादेशिक केंद्रे आहेत. विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींची नियुक्ती या सल्लागार मंडळावर करण्यात येत असते.