सर्वात लांब कान असलेल्या कुत्र्यापासून ते जगातील सर्वात उंच किशोरवयीन मुलापर्यंत गिनीज वर्ल्ड रेकोर्डने नुकतेच त्यांचे नवीन रेकोर्ड ब्रेकर्सची कामगिरी समोर आणली आहे. गुरुवारी प्रकाशित केलेल्या वार्षिक प्रकाशनात अनेक नवीन विक्रमांची नोंद झाली आहे. ब्रिटोन बेथोनी लॉज हा लहानपणापासूनच जिमनॅस्टिक्स करत होता. त्याने ४२.६४ सेकंदमध्ये १०० मीटर फॉरवर्ड रोल्स मारण्याचा विक्रम केला. तसेच एका तरुणीने सर्वाधिक समरसॉल्ट मारण्याचा विक्रम केला.
अमेरिकेचा झिओन क्लार्क याला जन्मतःच पाय नसून त्याने ४.७८ सेकंदात २० मीटर हातावर चालण्याचा विक्रम केला. स्वतःच्या केसांचा दोरी सारखा उपयोग ३० सेकंदात सर्वात जास्त दोरउड्या मारण्याचा विक्रम लेतितीआने केला. ३४ सेंटीमीटर लांब कान असलेल्या कुत्र्याची नोंद करण्यात आली आहे. अशा अनेक नवनवीन विक्रमांची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
सप्टेंबर अखेरपर्यंत असेल पावसाचा डेरा
हाताचा तळवा दाखवा, पैसे भरा…काय आहे हे तंत्र जाणून घ्या!
बाप्पाला सुखरूप घरी पाठवणारे कोळी बांधव मानधनाविना!
पंजाबमध्ये ‘पंजा’चा गोंधळ सुरूच! सुखजिंदर रंधावांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत
… म्हणून ती मेकअपविना सौंदर्य स्पर्धेत सहभागी झाली!
नुकत्याच पार पडलेल्या ‘मिस ग्रेट ब्रिटन’ स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात सेलीन पेजंट हिने चेहऱ्यावर कोणताही मेकअप न करता स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. ‘मिस ग्रेट ब्रिटन’ सारख्या सौंदर्य स्पर्धा म्हटल्या की मेकअप आणि भारीतले कपडे परिधान केलेले स्पर्धक डोळ्यासमोर उभे राहतात. मात्र पेजंट हिने स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात हा धाडसी निर्णय घेतला.
शरीराला आहे तसे स्वीकारण्यासाठी आणि शरीरातील सकारात्मकतेला पाठींबा देण्यासाठी तिने हा निर्णय घेतला असल्याचे पेजंट हिने सांगितले. तरुण पिढीला हा नवा संदेश मिळावा म्हणून तिने हा धाडसी निर्णय घेतला होता. शाळेत असताना तिला तिच्या केसांमुळे आणि शरीरयष्टीमुळे शाळेतील इतर विद्यार्थी चिडवत असत. त्यांच्या चिडवण्यामुळे तिने मेकअप करण्यास सुरुवात केली होती आणि तिने तिचे कुरळे केसही सरळ करून घेतले होते, असे तिने ‘वेल्स ऑनलाईन’शी बोलताना सांगितले. सेली ही एक मानसिक आरोग्यासाठी काम करणारी व्यक्ती असून ती सरे इथे वास्तव्यास आहे.