पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख उत्तर देत पाकिस्तानची राजनैतिक कोंडी केली आहे. १९६० च्या सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती दिल्याने पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. याचा परिणाम पाकिस्तानच्या कृषी क्षेत्रावर पडणार असून यामुळे भारताच्या या निर्णयावर पाकिस्तानमधून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) प्रमुख बिलावल भुट्टो- झरदारी यांनी यावर प्रतिक्रिया देताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. रक्ताचे पाट वाहण्याची भाषा त्यांनी एली होती. यावरून कॉंग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या बिलावल भुट्टोंना सणसणीत चपराक लगावली आहे.
शशी थरूर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, भारताने अजून तरी पाकिस्तानचं नुकसान मोठ्या प्रमाणावर करावं असं ठरवलेलं नाही. पण पाकिस्तानने कुरापती थांबवल्या नाहीत तर प्रतिक्रिया देऊ. रक्ताचे पाट वाहण्याच्या गोष्टी जे करत आहेत त्यांना सांगू इच्छितो सिंधु नदीतून भारतीयांचं रक्त वाहिलं तरीही त्यात पाकिस्तान्यांचं रक्त मोठ्या प्रमाणावर वाहिल हे लक्षात ठेवा. पाकिस्तानला हे लक्षात ठेवावं लागेल की ते भारतीयांना ठार करु शकत नाही. भारताकडे अणु बॉम्ब तयार आहे. पण नो फर्स्ट यूज हे आमचं धोरण आहे हे लक्षात ठेवा,” असं शशी थरुर यांनी बिलावल भुट्टोंना सुनावलं आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाची ही भावना आहे की पाकिस्तानच्या विरोधात जोरदार कारवाई केली जावी. पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसतो, प्रशिक्षण देतो हे सगळ्या जगाला माहीत आहे. दहशतवाद्यांना तयार करण्याचा पाकिस्तानचा पॅटर्न आहे. तरुणांची माथी भडकवली जातात, त्यांना चिथावणी दिली जाते आणि मग हातात हत्यारं देऊन ट्रेनिंग दिलं जातं. सगळं करुनही पाकिस्तान जबाबदारी झटकतो, मग परदेशातल्या एजन्सींकडून सत्य समोर येतं हे आजवर अनेकदा घडलं आहे, असंही शशी थरुर म्हणाले.
“You do not ask a murderer to investigate his own murders. Blood is going to flow — possibly more on their side than ours.” – Shashi Tharoor
The only Congressi with a spine. pic.twitter.com/jyk5d5KLUk
— BALA (@erbmjha) April 27, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी भारताने सिंधू पाणी वाटप करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. जाहीर सभेला संबोधित करताना बिलावल भुट्टो- झरदारी म्हणाले की, “सिंधू आमची आहे आणि आमचीच राहील. आमचे पाणी त्यातून वाहील किंवा त्यांचे रक्त वाहील.” यानंतर एकच खळबळ उडाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत भुट्टो म्हणाले की, पाकिस्तान किंवा आंतरराष्ट्रीय समुदाय त्यांच्या युद्ध भडकवण्याच्या किंवा सिंधू नदीचे पाणी वळवण्याच्या प्रयत्नांना सहन करणार नाही. ते (मोदी) म्हणतात की ते हजारो वर्षे जुन्या संस्कृतीचे वारस आहेत, परंतु ती संस्कृती मोहेंजोदारो, लरकाना येथे आहे. आम्ही तिचे खरे संरक्षक आहोत आणि आम्ही तिचे रक्षण करू, असे भुट्टो म्हणाले.
हे ही वाचा :
सलग चौथ्या दिवशी पाकिस्तानकडून एलओसीवर शस्त्रसंधीचे उल्लंघन
“इच्छा तिथे मार्ग”, मुख्यमंत्र्यांनी ‘मन कि बात’चा भाग गाडीतच पाहिला!
घाटकोपर: सोमय्यांच्या तक्रारीनंतर मुस्लीम जमात गौसिया मशिदीचे भोंगे उतरवले!
विक्रोळीत १३ बांग्लादेशी फेरीवाले ताब्यात!
१९६० मध्ये सिंधू खोऱ्यातील सहा नद्यांचे पाणी भारत आणि पाकिस्तानमध्ये कसे वापरायचे आणि वितरित करायचे याचे नियमन करणारा करार झाला होता. भारताने या कराराला स्थगिती दिल्याने आता भविष्यात पाकिस्तानवर याचे मोठे परिणाम होणार आहेत. कारण पाकिस्तानमधील शेती व्यवसायाला या नद्या ८०% पाणी पुरवतात.