एका शार्कने पर्यटकाला खाऊन टाकल्याचा हृदयद्रावक व्हीडिओ सध्या व्हायरल होत असून त्यात हा रशियन पर्यटक समुद्रात पोहत असताना शार्कने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला ओढत तो पाण्याखाली निघून गेला.
इजिप्तमधील ही घटना असून तेथील हरघाडा या प्रसिद्ध रिसॉर्टमध्ये राहात असलेल्या या २३ वर्षीय रशियन पर्यटकावर शार्कने हल्ला केला. सदर व्यक्ती आपल्या वडिलांना मदतीसाठी हाका मारत असताना व्हीडिओत ऐकायला येत आहे. त्याचवेळेला शार्क पाण्यात पोहोत असलेल्या त्या माणसाच्या जवळ येतो आणि त्याला ओढत खाली नेतो असे व्हीडिओत दिसते.
व्लादिमिर पोपोव्ह असे या माणसाचे नाव असून त्याच्यावर हल्ला करणारा शार्क हा टायगर शार्क म्हणून ओळखला जातो. त्याची मैत्रीण मात्र त्यात बचावते आणि तिथून निसटून जाण्यात यशस्वी ठरते. पाण्यात पोहत असलेला तो मुलगा आपल्या वडिलांना हाक मारत असतो पण तोपर्यंत शार्क त्याला ओढत नेतो. त्यामुळे पाणी लाल झाल्याचेही दिसते. शार्क मागून या माणसावर हल्ला करतो तेव्हा पाणी ढवळून निघाल्याचे दिसते. तो तरुण बाहेर येण्याचा प्रयत्न करतो पण त्याला ते शक्य होत नाही.
हे ही वाचा:
चित्रा वाघ संतापल्या, आव्हाड नाही…हाड हाड!
‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर आशिया कप, वर्ल्ड कप मोफत पाहता येणार
‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत महिन्याभरात १६३ मुले पुन्हा कुटुंबीयांकडे परतली!
पाकिस्तान सीमेवर ३७ कोटींचे हेरॉईन जप्त
हे अगदी काही सेकंदांत घडते. त्या हॉटेलचे कर्मचारी लोकांना पाण्यातून बाहेर येण्यास आणि तिथून लांब जाण्यास सांगत राहतात. एका महिलेने हे दृश्य पाहिल्यानंतर प्रतिक्रिया दिली की, अत्यंत भयंकर अशी ती घटना होती. अजूनही माझा थरकाप होत आहे. त्या माणसाच्या शरीराचे तुकडे पाण्यावर तरंगत आहेत.
Tourists stunned watching a Tiger Shark chomping a Russian tourist who was out on a swim at an Egypt beach resort
23YO Vladimir Popov died in the attack, girlfriend escaped alive. Shark has been captured & killed pic.twitter.com/xUsitoCN5X
— Nabila Jamal (@nabilajamal_) June 9, 2023
ही घटना घडत असताना काही लोक बोटीने त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतात पण तोपर्यंत शार्क त्या व्यक्तीला ओढत घेऊन जातो. त्यानंतर शार्कला पकडण्यात यश आल्याचेही वृत्त आहे. इजिप्तच्या पर्यावरण मंत्रालयाने जाहीर केले की, त्या शार्कला पकडण्यात आले आहे आणि त्याची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणार आहे.