जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांना लक्ष्य करून ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात आला. भारत सरकारनेही दहशतवाद्यांना आणि हल्ल्याच्या सूत्रधारांना कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या हल्ल्याची जबाबदारी ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या लष्कर-ए-तोयबाच्या समर्थक गटाने घेतली आहे. दरम्यान, पाकिस्तानने या हल्ल्यामागे आपला हात नसल्याचे म्हणत काढता पाय घेतला असला तरी पाकिस्तान सरकारने या हल्ल्याचा निषेध केलेला नाही. यावरूनचं पाकिस्तानला आता त्यांच्या लोकांकडूनचं घरचा आहेर दिला जात आहे.
पहलगाम येथील हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाचे वातावरण आहे. पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटर दानिश कानेरिया याने दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशय व्यक्त करत ट्वीटवरून पाकिस्तान सरकारला सुनावले आहे. त्याने ट्वीट करत म्हटले आहे की, “जर पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा खरोखरच काही सहभाग नसेल, तर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अद्याप हल्ल्याचा निषेध का केला नाही? तुमचे सैन्य अचानक हाय अलर्टवर का आहे? कारण खोलवर, तुम्हाला सत्य माहित आहे. तुम्ही दहशतवाद्यांना आश्रय देत आहात आणि त्यांचे पालनपोषण करत आहात. तुम्हाला लाज वाटली पाहिजे,” असे ट्वीट करत दानिश याने पाकिस्तान सरकारवर निशाणा साधला आहे.
If Pakistan truly has no role in the Pahalgam terror attack, why hasn’t Prime Minister @CMShehbaz condemned it yet? Why are your forces suddenly on high alert? Because deep down, you know the truth — you’re sheltering and nurturing terrorists. Shame on you.
— Danish Kaneria (@DanishKaneria61) April 23, 2025
हे ही वाचा..
पहलगाम हल्ला : मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विहिंपकडून यज्ञ
२० हजार जवानांनी एक हजार नक्षलवाद्यांना घेरले, पाच नक्षलवादी ठार!
पहलगाम हल्ल्यानंतर उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक, एक जवान हुतात्मा!
“असीम मुनीर आणि ओसामा बिन लादेन एकसारखेच; त्यांचा शेवटही सारखाच असावा”
दानिश कानेरिया हा पाकिस्तानी हिंदू क्रिकेटर असून अनेक आंतराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व केलं आहे. पाकिस्तानी हिंदू क्रिकेटपटू कनेरिया २००० ते २०१० दरम्यान राष्ट्रीय संघासाठी खेळला. स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांनंतर, त्याला ईसीबीने आजीवन बंदी घातली आणि त्याने २०१३ मध्ये अपीलही फेटाळले. २०१८ मध्ये, कनेरियाने एका मॅच फिक्सरला भेटल्याचे कबूल केले होते, परंतु त्याने खुलासा केला की त्याला त्यावेळी ती व्यक्ती फिक्सर आहे हे माहित नव्हते.