ऍमेझॉनमध्ये पाण्याचे तापमान वाढले; १००हून अधिक डॉल्फिनचा मृत्यू

ऍमेझॉन नदीच्या पाण्यातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हजारो मासे मरण पावले होते

ऍमेझॉनमध्ये पाण्याचे तापमान वाढले; १००हून अधिक डॉल्फिनचा मृत्यू

गेल्या आठवड्यापासून तब्बल १२० डॉल्फिनचे मृतदेह अमेझॉन नदीच्या उपनदीवर तरंगताना आढळून आले आहेत. तज्ज्ञांच्या मते, तीव्र दुष्काळ आणि उष्णतेमुळे ही घटना घडली आहे. तीव्र दुष्काळात नदीची पातळी कमी झाल्यामुळे डॉल्फिनसाठी असह्य तापमानापर्यंत पाणी गरम होते, असे संशोधकांचे मत आहे. अलीकडेच ऍमेझॉन नदीच्या पाण्यातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हजारो मासे मरण पावले आहेत.

 

ऍमेझॉन नदीमधील हे डॉल्फिन आकर्षक गुलाबी रंगाचे आहेत. या अद्वितीय प्रजाती केवळ दक्षिण अमेरिकेतील नद्यांमध्ये आढळणाऱ्या गोड्या पाण्यात आढळतात. तसेच, जगात शिल्लक राहिलेल्या गोड्या पाण्यातील डॉल्फिन प्रजातींपैकी त्या एक आहेत. मात्र त्यांच्या पुनरुत्पादक चक्राच्या संथगतीमुळे त्यांच्या प्रजातीला धोका निर्माण झाला आहे.

 

डॉल्फिनच्या मृत्यूचे खरे कारण समजून घेण्यासाठी त्यांचे शवविच्छेदनाचे काम सुरू करण्यात आले आहे. या डॉल्फिनच्या शवातून कुजणारी दुर्गंधी सुटली आहे. या दुर्गंधीतच जीवशास्त्रज्ञ आणि इतर तज्ज्ञांनी पांढरे संरक्षणात्मक कपडे आणि मुखवटे घालून सोमवारपासूनच शवविच्छेदन करण्यास सुरुवात केली. अर्थात दुष्काळ आणि उष्णतेमुळेच डॉल्फिनच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे, असे शास्त्रज्ञही पूर्ण खात्रीने सांगू शकत नाहीत.

हे ही वाचा:

सुंदर दिसण्याच्या महत्त्वाकांक्षेने केला श्रीदेवीचा घात?

कनोइंग स्पर्धेत भारताच्या अर्जुन सिंह, सुनिल सिंह यांची कांस्य पदकाची कमाई

रासायनिक बॉम्बस्फोट घडवून २६/११ पेक्षा मोठ्या हल्ल्याचा होता कट

मुंबई पोलीस दलात ‘मिशन कर्मयोगी’ उपक्रम राबविण्यात येणार

 

गुरुवारी टेफे सरोवराच्या पाण्याचे तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. तेव्हा किमान ७० डॉल्फिनचे शव आढळले. हे तापमान वर्षाच्या या वेळेच्या सरासरीपेक्षा १० अंशांनी जास्त आहे. काही दिवस पाण्याचे तापमान कमी झाले होते, परंतु रविवारी ते पुन्हा ३७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले, असे तज्ज्ञांनी सांगितले.

Exit mobile version