हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील बंजार खोऱ्यातील घियागी परिसरात रात्री साडेआठ वाजता एक भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलर ५०० फूट दरीत कोसळली.
बंजार पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक तपासानुसार मृत्यू झालेले हे आयआयटी वाराणसीचे विद्यार्थी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आयआयटी वाराणसीच्या विद्यार्थ्यांसह एकूण १७ पर्यटक दिल्लीतील मजनून टिल्ला येथून टेम्पो ट्रॅव्हलर बुक करून कुलूला आले होते. सर्व विद्यार्थी जळोडी होल्डिंग येथून बंजारच्या दिशेने परतत असताना ही घटना घडली. यादरम्यान ब्रेक न लागल्याने कार घियागी वळणजवळ ५०० मीटर खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. पर्यटकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले.
हे ही वाचा:
भारतात चाइल्ड पोर्नोग्राफीविरोधात ‘ऑपरेशन मेघदूत’
बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी
नवरात्र २०२२: महाराष्ट्राचं शक्तीस्थळ तुळजापूर
नवरात्रीसाठी बाजार फुलले, धारावीच्या कुंभारवाड्यात लगबग सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले, मात्र मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे जखमींना बाहेर काढण्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.या अपघातात चार विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन विद्यार्थ्यांचा बंजारा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात आणण्यात आले जेथे गंभीर जखमी विद्यार्थ्यांना प्रादेशिक रुग्णालयात कुल्लू येथे प्राथमिक उपचारानंतर रेफर करण्यात आले.
पोलिस अधीक्षक गुरुदेव शर्मा यांनी सांगितले की, अपघातात ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.