बलुचिस्तानमध्ये सुरुंगस्फोट; युनियन कौन्सिलच्या अध्यक्षासह सात जणांचा मृत्यू

बाल्तागर युनियन कौन्सिलचे अध्यक्ष इश्तियाक याकूब काही लोकांसमवेत एका लग्नसोहळ्यातून परत येत होते

बलुचिस्तानमध्ये सुरुंगस्फोट; युनियन कौन्सिलच्या अध्यक्षासह सात जणांचा मृत्यू

बलुचिस्तानमधील पंजगुर जिल्ह्यात एका वाहनाला लक्ष्य करून घडवून आणलेल्या सुरुंगस्फोटात युनियन कौन्सिलच्या अध्यक्षांसह सात जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामागे बलोच लिबरेशन फ्रंटचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बलुचिस्तानमधील पंजगुर जिल्ह्यामध्ये एका वाहनाला लक्ष्य करून हा हल्ला केला गेला. ‘बाल्तागर युनियन कौन्सिलचे अध्यक्ष इश्तियाक याकूब काही लोकांसमवेत एका लग्नसोहळ्यातून परत येत होते. या गाडीमध्ये एक रिमोट विस्फोटक उपकरण बसवण्यात आले होते. गाडी जशी बाल्तागर परिसरातील चकर बाजारात पोहोचली, तेव्हाच स्फोट झाला. यात सात जण मारले गेले.

हे ही वाचा:

टेस्लाला प्राप्त होणार भारतीय ‘वैभव’

टोमॅटो भडकल्याने शाकाहारी थाळीच्या दरात २८ टक्के वाढ

सरकार जिंकले; दिल्ली सेवा विधेयक १३१ वि. १०२ मतांनी संमत

अविश्वास ठरावासाठी बीजेडीचा मोदी यांना पाठिंबा का?

इश्तियाक याकूब, मोहम्मद याकूब, इब्राहिम, वाजिद, फिदा हुसैन, सरफराज आणि हैदर अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व जण बाल्तागर आणि पंजगुर येथील रहिवासी होते. चार मृतांची ओळख त्यांच्या नातेवाइकांनी पटवली आहे. सन २०१४मध्ये अशाच प्रकारे इश्तियाक याकूब यांचे वडील याकूब बलगात्री यांची बॉम्बस्फोट घडवून हत्या करण्यात आली होती. तेव्हा बंदी घालण्यात आलेल्या बलोच लिबरेशन फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. आता मात्र कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. तरीही हा हल्ला बलोच लिबरेशन फ्रंटनेच केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

Exit mobile version