25 C
Mumbai
Thursday, January 16, 2025
घरक्राईमनामा३६ जणांची हत्या करणाऱ्या सिरीयल किलरला अटक

३६ जणांची हत्या करणाऱ्या सिरीयल किलरला अटक

सीरियल किलरला अटक

Google News Follow

Related

बेछूट गोळीबार करत गोळ्या झाडून मृतदेहांचा खच पाडणाऱ्या सिरीयल किलरला थायलंडमध्ये अटक केली आली आहे. क्रौयाच्या सर्व मर्यादा ओलांडणाऱ्या या मारेकऱ्याने अवघ्या तीन तासांत २२ मुलांसह ३६ जणांची निर्घृण हत्या केली होती. ही बहुतेक मुले दोन ते पाच वर्ष वयोगटातील होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर रोजी थायलंडमध्ये एका व्यक्तीने तीन तास सतत गोळ्या झाडून हत्या केली होती. पन्या नावाच्या या व्यक्तीने तीन तासांत २२ निष्पाप मुलांसह ३६ जणांची हत्या केली होती. या हत्येपूर्वी त्याचे आपल्या महिला मैत्रिणीशी भांडण झाल्याचा दावा करण्यात आला होता. ड्रग्ज घेतल्याप्रकरणी पन्यावर आधीच चाचणी सुरू असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी लवकरच निर्णय होणार आहे. या कारणावरून त्याची महिला मैत्रिण त्याला सोडण्याबाबत बोलत होती, त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले.

हे ही वाचा:

इराणमधील महसा अमिनी प्रकरण जगासमोर आणणाऱ्या महिला पत्रकाराला अटक

ठाकरे गटाच्या मशालीवर ‘या’ पक्षाने केला दावा

उद्धव ठाकरेंच्या तीन नेत्यांवर गुन्हा दाखल

उद्धव ठाकरे ‘स्वबळ’ दाखवा !

अमली पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप झाल्यानंतर पन्यालाही पोलिसांच्या नोकरीतून काढून टाकण्यात आले होते, त्यामुळे तो आर्थिक संकटात सापडला होता. मात्र, पन्याने आपल्या महिला मैत्रिणीशी झालेल्या भांडणातून थायलंडमधील सर्वात मोठी हत्या केली असावी, हा दावा पोलिसांनी पूर्णपणे मान्य केलेला नाही. या ३६ हत्यांच्या मागे नोकरी गमावणे, अंमली पदार्थांबाबतचा निकाल किंवा आर्थिक अडचणी असू शकतात असा कयास थायलंडचे पोलीस उपप्रमुख जनरल सरचेट यांनी व्यक्त केला आहे. पोलीस सतर्क असते तर आरोपी एवढी मोठी घटना घडवू शकले नसते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मृत्युमुखी पडलेल्या मुलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा