पाकिस्तानमध्ये नेत्यांच्या अटकेचे सत्र सुरूच असून पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या (पीटीआय) नेत्यांवर पोलिसांकडून कारवाई सुरूच आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचे निकटवर्ती फवाद चौधरी यांच्यानंतर आता आता पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्षा डॉ. शिरीन मजारी यांना इस्लामाबाद पोलिसांनी अटक केली. आज पहाटे त्यांच्या निवासस्थानातून त्यांना अटक करण्यात आली.
शुक्रवार, १२ मे रोजी फेडरल कॅपिटलमधील मजारी यांच्या निवासस्थानी छापा टाकून त्यांना पोलिसांनी अटक केली. आतापर्यंत इम्रान खान यांच्या व्यतिरिक्त फवाद चौधरी, असद उमर, शाह मेहमूद कुरेशी, अली मोहम्मद खान आणि सिनेटर एजाज चौधरी यांच्यासह अनेक पीटीआय नेत्यांना अटक करण्यात आली आहे. या सर्व नेत्यांना मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डरच्या (MPO) कलम तीन अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
Pakistan: PTI leader Shireen Mazari arrested in Islamabad
Read @ANI Story | https://t.co/dXkB7OnBt2#Pakistan #ShireenMazari #arrested #Islamabad pic.twitter.com/hfFlgMaDWj
— ANI Digital (@ani_digital) May 12, 2023
फवाद चौधरी यांना सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरातून ताब्यात घेण्यात आले. असद उमर यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक करण्यात आली. तर, शाह मेहमूद कुरेशी यांना इस्लामाबादमधील गिलगिट बाल्टिस्तान हाऊसमधून अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा:
कायदा सुव्यवस्था बिघडेल म्हणून चित्रपट न दाखवणे पूर्णतः अयोग्य
एलन मस्क ‘ट्विटर’च्या सीईओपदाचा राजीनामा देणार
बॉडी बिल्डर संकल्प भाटकरला आईच्या हत्येप्रकरणी अटक
इम्रान खान यांना बुधवार, ९ मे रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आवारातूनच पाकिस्तानी रेंजर्सच्या सैनिकांनी अटक केली होती. त्यानंतर पीटीआय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यातून पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.