इस्रायलच्या हल्ल्यात हमासचा वरिष्ठ कमांडर ठार; गाझामधील बळींची संख्या सात हजारांवर

गाझा पट्टीमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात मारला गेल्याचा दावा

इस्रायलच्या हल्ल्यात हमासचा वरिष्ठ कमांडर ठार; गाझामधील बळींची संख्या सात हजारांवर

हमासचा वरिष्ठ कमांडर हसन अल-अबादाल्लाह हा गाझा पट्टीमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात मारला गेल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षण दलाने गुरुवारी केला. तर, गाझा पट्टीमधील एकूण बळींची संख्या सात हजार २८ वर पोहोचली आहे. यात दोन हजार ९१३ लहान मुलांचा समावेश आहे, असा दावा पॅलिस्टिनी आरोग्य मंत्रालयाने केला आहे. इस्रायल आता गाझा पट्टीत जमिनीवरून लढाई करण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र त्यांनी या मोहिमेची विस्तृत माहिती दिलेली नाही.

इस्रायलच्या संरक्षण दलाने रात्रभर उत्तर गाझा भागांत हमासचे दहशतवादी जेथे एकत्र जमतात, तेथे लक्ष्य करून हल्ले केले. हमासचा उत्तरेकडील कमांडर हसन अल-अबादाल्लाह येथे असल्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर इस्रायलच्या संरक्षण दलाने केलेल्या हवाई हल्ल्यात तो मारला गेला. इस्रायलच्या संरक्षण दलाने हमासच्या अन्य सैनिकांनाही मारले आहे आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत.

पुढच्या तीव्र लढ्यासाठीची ही तयारी असल्याचे इस्रायलच्या संरक्षण दलातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत इस्रायलप्रति संवेदना व्यक्त केली आणि इस्रायलला स्वसंरक्षणासाठी गाझा पट्टीवर हल्ला करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे मत व्यक्त केले.

हे ही वाचा:

पोलिसांनी ओळखले सोनसाखळी चोराचे ‘रंग’

मृत्युदंडाच्या शिक्षेपासून आठ भारतीय वाचू शकतील का?

‘अल जझिराचे युद्धावरील वृत्तांताचे प्रमाण कमी करा’

वडाळ्यात सापडला महिलेचा तुकडे केलेला मृतदेह

त्याचवेळी गाझामधील पॅलिस्टिनी नागरिकांप्रति मानवातावादी दृष्टिकोनातून केली जाणारी मदत वाढवण्यावरही त्यांनी जोर दिला. तसेच, इस्रायली आणि पॅलिस्टिनी दोन्हीकडच्या नागरिकांना त्यांच्या जागी सुरक्षित, आत्मसन्मानाने आणि शांततेत राहण्याचा अधिकार आहे, असे मतही त्यांनी मांडले.

Exit mobile version