पाकिस्तानच्या खैबर पख्तूनवा प्रांतात सोमवारी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे. मौलाना काशिफ अली असे या दहशतवाद्याचे नाव असून त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. तो दहशतवादी संघटना असलेल्या लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ कमांडर होता.
पाकिस्तानमधील खैबर पख्तूनवा प्रांतातील स्वाबी जिल्ह्यात लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ कमांडर काशिफ अली वास्तव्यास होता. त्याच्या घराबाहेरचं त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. एका अज्ञात दुचाकीस्वाराने काशिफ याच्यावर स्वयंचलित शस्त्रांनी गोळ्या घालून हत्या केली. यात तो जागीच ठार झाला.
दहशतवादी काशिफ अली हा तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादी संघटनेमध्ये भरती करायचा. काशिफ अली हा अनेक मशिदी आमि मदरशांचा प्रभारीही होती. तो दहशतवादाचे धडे देऊन मदशात शिकणाऱ्या तरुणांना दहशतवादी संघटनेमध्ये भरती करायचा. त्याशिवाय तो दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये जिहादी धडे देण्याचं कामही करायचा. काशिफ अली हा दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाची राजकीय संघटना असलेल्या पीएमएएमएलशीही संबंधित होता.
हे ही वाचा..
काँग्रेसचे चीन प्रेम पुन्हा दिसले
२०३६ ऑलिंपिकचे यजमान पद मिळाल्यास सर्वात हरित ऑलिंपिक भारतात होईल
२० फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या नव्या मुखमंत्र्यांचा शपथविधी!
संभल हिंसाचार प्रकरणी हसन आणि समदला अटक, दगडफेकीची दिली कबुली!
दहशतवादी काशिफ अली याचा खात्मा केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून निसटून जाण्यास यशस्वी झाला आहे. तर, काशिफ याच्या हत्येनंतर दहशतवादी संघटनांशी निगडित असलेल्या अनेक संघटनांनी पाकिस्तान सरकारवर जोरदार टीका केली आहे. तर, आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. मागच्या काही काळापासून पाकिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांकडून बऱ्याच दहशतवाद्यांच्या हत्या झाल्या आहेत. यामध्ये दहशतवाद्यांच्या काही वरिष्ठ कमांडर आणि नेत्यांचाही समावेश आहे.