कोरोनाच्या महामारीमुळे समाजातील सगळ्याच घटकांना आर्थिक फटका बसला आहे. मनोरंजनसृष्टीही त्याला अपवाद नाही. ज्येष्ठ अभिनेत्री सुनिता शिरोळे यांनाही सध्या बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. कमी झालेलं काम, आजारपण आणि वाढता वैद्यकीय खर्च यामुळे त्यांच्यावर सर्व बाजूंनी संकट ओढवले आहे. सुनिता यांनी ‘शापित’, ‘द लिजेंड ऑफ भगतसिंग’, ‘बजरंगी भाईजान’, ‘मेड इन चायना’, ‘किस देस मे हे मेरा दिल’ या सिनेमांमध्ये त्यांनी काम केले होते.
कोरोनाची साथ येईपर्यंत मी काम केले. पण नंतर लॉकडाऊनच्या काळात मूत्रपिंड आणि गुडघेदुखीचा त्रास वाढल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. रुग्णालयात असतानाही दोन वेळा पडल्याचे त्यांनी सांगितले. डावा पाय फ्रॅक्चर झाला आणि आता पाय वाकवताही येत नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या त्या नुपूर अलंकार यांच्या घरी राहत असून त्यांनी त्यांची काळजी घेण्यासाठी एका नर्सला ठेवले आहे.
हे ही वाचा:
सिप्झला मिळणार केंद्राकडून ‘ही’ आर्थिक मदत
राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जातीवाद वाढला
मोदी सरकारची विद्युत वाहनांच्या दिशेने वेगाने वाटचाल
माझे चलतीचे दिवस असताना मी खूप पैसा कमावला आणि गरजूंना मदतही केली. पण माझ्यावर असे हालाकीचे दिवस येतील असा कधीही विचार केला नव्हता, असेही त्या म्हणाल्या. सध्या मी दुनियेच्या मेहेरबानीवर जगत आहे. या अवघड परिस्थितीसाठी पैसे न साठवल्याच आणि स्वतःच घर न घेतल्याचे दुःख होत असल्याचे त्यांनी सांगितले. पैशांची गरज असल्यामुळे लवकरात लवकर काम करण्याची इच्छा आहे. पण माझ्या पायाची अवस्था वाईट आहे. मी कधी चालू शकेन याची कल्पना नाही. त्यामुळे मी माझ्या पायावर उभे राहता येईपर्यंत आर्थिक मदतीची गरज असल्याचे सुनिता यांनी सांगितले.