तुरुंगात टाका पण बायकोसोबत राहणार नाही

तुरुंगात टाका पण बायकोसोबत राहणार नाही

बहुतेक लोकं कोणत्याही परिस्थितीत तुरुंगात जाणे टाळतात. परंतु इटलीतील एका माणसाने घरी राहणे असह्य झाल्याने तुरुंगात पाठवण्याची परवानगी मागितली आहे.

तुमचा विश्वास बसणार नाही पण, नजरकैदेत असलेल्या या इटालियन नागरिकाने ‘घरचे जीवन नरक बनले आहे’ म्हणून त्याला त्याच्या पत्नीसोबत राहू देण्याऐवजी त्याला तुरुंगात टाकण्याची विनंती केली.

युरो न्यूजनुसार, रोमजवळील गुइडोनिया मोंटेसेलिओ येथे राहणारा अल्बेनियन वंशाचा ३० वर्षीय तरुण अलीकडेच एका स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये गेला आणि म्हणाला, “मी हे आता सहन करू शकत नाही. मला तुरुंगात टाका.”

अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांसाठी हा माणूस अनेक महिन्यांपासून नजरकैदेत होता. तो आणखी काही वर्षे तेथे राहण्याची अपेक्षा होती, असे टिवोली काराबिनेरीचे कॅप्टन फ्रान्सिस्को गियाकोमो फेरंटे यांनी एएफपीला सांगितले. “तो घरी पत्नी आणि कुटुंबासह राहत होता. परंतु त्याला तिथे त्यांच्यासोबत राहणे जमले नाही.” असं फेरांटे म्हणाले.

तथापि, तो यापुढे आपल्या पत्नीसोबत सक्तीच्या सहवासाचा सामना करू शकत नाही, म्हणून त्याने पळून जाण्याचा आणि पोलिसांना शरण जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना विचारले की तो तुरुंगात आपली शिक्षा भोगू शकेल का? असे अहवालात म्हटले आहे.

हे ही वाचा:

आजारी सचिन वाझे चांदीवाल आयोगापुढे गैरहजर

अमरिंदर सिंग-अमित शहा भेटीत युतीची चर्चा?

‘बुलढाणा अर्बन’ ची आयकर विभागामार्फत चौकशी

“…आपली बहिण”, क्रांति रेडकरांचे मुख्यमंत्र्यांना खुले पत्र

द लोकलच्या म्हणण्यानुसार, त्याच्या नजरकैदेचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हेगाराला त्वरित अटक करण्यात आली. त्यामुळे त्याला जे हवे होते ते मिळाले. अटकेनंतर, न्यायालयीन अधिकाऱ्यांनी उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी त्याची कारागृहात बदली करण्याचे आदेश दिले आहेत.

Exit mobile version