भारतीय शास्त्रज्ञांकडून हिमालयातील प्राचीन महासागराचा शोध

विस्तृत भागाचा अभ्यास करून काढला निष्कर्ष

भारतीय शास्त्रज्ञांकडून हिमालयातील प्राचीन महासागराचा शोध

भारतीय शास्त्रज्ञांनी हिमालयातील प्राचीन महासागराचा शोध लावला आहे. संशोधकांनी पश्चिम कुमाऊं हिमालयाच्या अमृतपूरपासून मिलम हिमनदीपर्यंत आणि डेहराडून ते गंगोत्री हिमनदीपर्यंतच्या विस्तृत भागाचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरू आणि निगाता युनिव्हर्सिटी, जपानच्या शास्त्रज्ञांनी हिमालयातील एका प्राचीन महासागराचे अवशेष शोधून काढले आहेत. या पथकाला सुमारे ६० कोटी वर्षांपूर्वीच्या खनिज साठ्यांमध्ये अडकलेले पाण्याचे थेंब सापडले आहेत.

 

 

प्रीकॅम्ब्रियन रिसर्चमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, हे खनिज साठे, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम कार्बोनेटने समृद्ध आहेत. त्यामुळे हे साठे प्राचीन महासागराचे अवशेष दाखवणारे जणू ‘टाइम कॅप्सुल’ आहेत,’ असे सेंटर फॉर अर्थ सायन्सेसचे पीएचडीचे विद्यार्थी आणि या अभ्यासाचे प्रमुख प्रकाश चंद्र आर्य यांनी सांगितले.

 

 

शास्त्रज्ञांचा असा सिद्धांत आहे की ५० ते ७० कोटी वर्षांपूर्वी, पृथ्वीवर दीर्घकाळ हिमनदीचा कालावधी होता, ज्याला ‘स्नोबॉल अर्थ ग्लेसिएशन’ म्हणून ओळखले जाते. यानंतर दुसरी ‘ग्रेट ऑक्सिजनेशन’ घटना घडली. म्हणजे तेव्हा जिवंत असलेल्या घटकांची जैविक प्रक्रिया झाली. परिणामी, वातावरणातील ऑक्सिजनच्या पातळीत वाढ झाली आणि उत्क्रांती झाली. तथापि, चांगल्या प्रकारे जतन केलेल्या जीवाश्मांच्या कमतरतेमुळे आणि प्राचीन महासागरे गायब झाल्यामुळे या घटनांमधील संबंध गूढच राहिला आहे.

हे ही वाचा:

अंजू झाली आता पाकिस्तानी, परतणे कठीण

पाकिस्तानमधील भाच्यांची भारतातील मामाशी भेट होणार

अवैध बांधकाम तोडण्यासाठी हवे तर योगींकडून बुलडोझर उसने घ्या!

छोटा शकीलचा शूटर लईक शेखच्या २५ वर्षांनंतर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

हिमालयातील नव्याने सापडलेल्या सागरी खडकांमुळे काही उत्तरे मिळू शकतात. संघाचे निष्कर्ष असे सूचित करतात की, हिमनद्यांच्या कालावधीत खोऱ्यांमध्ये दीर्घकाळ कॅल्शियमची कमतरता जाणवली. कॅल्शियमच्या या कमतरतेमुळे मॅग्नेशियमच्या पातळीत वाढ झाली, परिणामी मॅग्नेशियमचे साठे, प्राचीन महासागराचे पाणी स्फटिकासारखे अडकले.

 

 

या कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पोषक तत्त्वांची कमतरता भासून हळूहळू वाढणाऱ्या प्रकाशसंश्लेषक जिवाणूंसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. या जीवांनी वातावरणात अधिक ऑक्सिजन सोडण्यास सुरुवात केल्यामुळे दुसरी ‘ग्रेट ऑक्सिजनेशन’ प्रक्रिया घडली असावी, असे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. संशोधकांनी त्यांचा अभ्यास पश्चिम कुमाऊँ हिमालयाच्या अमृतपूरपासून मिलम हिमनदीपर्यंत आणि डेहराडून ते गंगोत्री हिमनदीपर्यंतच्या विस्तृत भागात केला. या साठ्यांचा उगम अशा इतर स्रोतांऐवजी प्राचीन महासागरातील पाण्यातून झाला होता. या निष्कर्षामुळे प्राचीन महासागरांच्या रासायनिक रचनेबाबत आणि जीवनाच्या उत्क्रांतीबद्दल अधिक माहिती मिळू शकेल.

Exit mobile version