‘इंडियन आयडल’फेम सायली कांबळेचा कारुळकर प्रतिष्ठानतर्फे खास गौरव

‘इंडियन आयडल’फेम सायली कांबळेचा कारुळकर प्रतिष्ठानतर्फे खास गौरव

इंडियन आयडल या रिऍलिटी शोमध्ये पहिल्या तीन क्रमांकात स्थान मिळविणाऱ्या आणि आपल्या सुमधूर गायकीने चाहत्यांची मने जिंकणाऱ्या सायली कांबळेचा खास सत्कार कारुळकर प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी प्रतिष्ठानच्या कार्यालयात करण्यात आला. भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते सायलीला शाल आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ‘न्यूज डंका’चे संपादक दिनेश कानजीही उपस्थित होते. निमित्त होते, सायलीची ‘न्यूज डंका’मधील खास मुलाखत.

१५ ऑगस्टला झालेल्या इंडियन आयडलच्या ग्रँड फिनालेमध्ये सहभागी झालेल्या सहा स्पर्धकांत महाराष्ट्राची शान असलेल्या सायलीने पहिल्या तीन क्रमांकात स्थान मिळवल्यानंतर देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. आज तिला भेटण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांतून लोक मुंबईत येतात. या आणि अशा अनेक विलक्षण अनुभवांबद्दल सायली या मुलाखतीत बिन्धास्त बोलली आहे.

इंडियन आयडलमधील ग्रँड फिनालेपर्यंतचा स्वप्नवत प्रवास, अंतिम फेरीत तिसरा क्रमांक मिळविल्यानंतर बदललेले आयुष्य, इंडियन आयडलच्या विजेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या इतर सहभागी स्पर्धकांबरोबरची तिचे तयार झालेले अतूट नाते, तिच्या या यशातील आईवडिलांचे अमूल्य योगदान, तिने घेतलेली मेहनत, तिचे पुढील ध्येय, आशाताई भोसले यांचे तिच्या गायनप्रवासात असलेले अद्वितीय स्थान, तिच्या आवडीनिवडी अशा अनेक विषयांवर सायलीने दिलखुलास बातचीत केली. बदललेल्या सायलीचे नवे रूप काय आहे, हे या मुलाखतीतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तिची ही विशेष मुलाखत सोमवारी ‘न्यूज डंका’च्या यू ट्यूब चॅनलवर प्रसारित होणार आहे.

हे ही वाचा:

गाडीत पिस्तुल ठेऊन करूणा मुंडे यांना अडकवण्याचा प्रयत्न?

सुनील यादव यांच्या रूपातील अजातशत्रू जननेता गमावला

जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल

भारतीय संघाच्या चिंता वाढल्या! रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव

सत्कारानंतर सायलीने हिंदी, मराठी आणि गुजरातीत गाणे पेश करून आपल्या बहुढंगी गायकीचा नजराणाही पेश केला.

Exit mobile version