मुस्लिम देश सौदी अरेबिया जो कधी कट्टरतेसाठी बदनाम होता, तेथील मोहम्मद बिन सलमान हे आता देशाची आणि स्वतःची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. सौदी अरेबिया अधिकृतरीत्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होणार आहे. असे करणारे हे पहिले इस्लामी राष्ट्र ठरले आहे.
२७ वर्षीय मॉडेल रूमी अलकाहतानी सौदी अरेबियाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. हे सौदी अरेबियासाठी आणखी एक ऐतिहासिक पाऊल आहे. याआधी नुकतेच सौदी अरेबियाने गैर-मुस्लिम राजनैतिक अधिकाऱ्यांना मद्यखरेदी करण्यास परवानगी दिली होती. तसेच, महिलांना सार्वजनिकपणे गाडी चालवण्यास आणि पुरुषांच्या सोबत कार्यक्रमात सहभाग घेण्यास परवानगी दिली होती. २७ वर्षीय मॉडेल रूमी अलकाहतानी हिने सोमवारी इन्स्टाग्रामवर ती मिस युनिव्हर्स स्पर्धेत सौदी अरेबियाचे प्रतिनिधीत्व करणार असल्याचे जाहीर केले होते.
हे ही वाचा:
संदेशखालीतील महिला म्हणजे ‘शक्तीस्वरूप’
पाकिस्तानला दहशतवादाने पछाडले, चीनच्या गुंतवणुकीच्या विरोधात दुसरा हल्ला
कोण आहे रूमी?
सौदी अरेबियामधील रियाध येथे राहणारी रुमी अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी होते. काही आठवड्यांपूर्वी तिने मलेशियात आयोजित मिस अँड मिसेस ग्लोबल एशियनमध्ये भाग घेतला होता. ‘वैश्विक संस्कृतींबाबत जाणून घेणे आणि सौदी संस्कृती आणि वारशाला जगापुढे आणण्याचा माझा विचार आहे,’ असे तिने सांगितले. मिस सौदी अरेबियासह रूमीने मिस मिडल ईस्ट (सौदी अरेबिया), मिस अरब मिस वर्ल्ड २०२१ आणि मिस वुमन (सौदी अरेबिया) हे किताब जिंकले आहेत.
महिलांवरील निर्बंध हटवले
सौदी अरेबियाने नुकतेच गाडी चालवण्यास, पुरुषांसह कार्यक्रमात भाग घेण्यास आणि विनापुरुष पासपोर्टसाठी अर्ज करण्यास परवानगी दिली आहे. तसेच, गैर मुस्लिम राजनैतिक अधिकाऱ्यांना मद्य खरेदी करण्याची परवानगी दिली आहे.