सौदी अरेबियातील विद्यार्थी गिरवतायंत रामायण, महाभारताचे धडे

सौदी अरेबियातील विद्यार्थी गिरवतायंत रामायण, महाभारताचे धडे

सौदी अरेबियातील विद्यार्थी आता रामायण, महाभारताचे पाठ शिकत आहेत. सौदी अरेबियाच्या नवीन शालेय अभ्यासक्रमात रामायण, महाभारत यांचा समावेश करण्यात आला आहे. समाजशास्त्र विषयाच्या अंतर्गत मुलांना या महाकाव्याचे धडे दिले जात आहेत. सौदी अरेबियाच्या ‘व्हिजन २०३०’ या महत्वाकांक्षी मोहिमे अंतर्गत शिक्षण क्षेत्रात हा क्रांतिकारी बदल करण्यात आला आहे.

इस्लामी देश अशी ओळख असलेल्या सौदी अरेबिया देशात सध्या बदलाचे वारे वाहत आहेत. सौदीचे युवराज सलमान यांच्या पुढाकाराने ‘सौदी अरेबिया व्हिजन २०३०’ हा उपक्रम सध्या देशात राबवला जात आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट सौदी अरेबिया देशाला २०३० पर्यंत औद्योगिक महासत्ता बनवणे आणि आर्थिक प्रगती हे आहे. त्या दृष्टीने सौदी अरेबियामध्ये प्रत्येक क्षेत्रातच बदल केले जात आहेत. यातलेच महत्वाचे म्हणजे शिक्षण क्षेत्र. या ‘व्हिजन २०३०’ कार्यक्रमाच्या अंतर्गत शिक्षण क्षेत्रात खूप महत्वाचे बदल केले जात आहेत. सौदीतील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे शिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच सौदीतील विद्यार्थ्यांना इतर देशातील संस्कृतीची ओळख व्हावी या दृष्टीने अभ्यासक्रमात बदल केले आहेत.

हे ही वाचा:

कोलकाता नाइट रायडर्सचे ‘इशारों इशारों में’

कोरोना झाला तर ‘या’ कंपनीत २१ दिवसांची पगारी सुट्टी

देवेंद्र फडणवीसांचे ज्युलिओ रिबेरोंना खुले पत्र

२ मे ला विजयोत्सवावर बंदी

याचाच एक भाग म्हणून सौदीतील शालेय अभ्यासक्रमात रामयण, महाभारत या महाकाव्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्यावर आधारितही कथांचाही समावेश आहे. तसेच भारतीय संस्कृतीतील योग आणि आयुर्वेद या विषयांचाही समाचवेश करण्यात आला आहे. जागतिक पातळीवर महत्वाच्या असणाऱ्या भारतीय संस्कृतीची ओळख सौदीच्या विद्यार्थ्यांना व्हावी हा या मागचा प्रमुख उद्देश आहे.

काही दिवसांपूर्वी सौदीमधील पद्मश्री पुरस्कार प्राप्त नऊफ आलं मरवाई या योग शिक्षिकेने तिच्या मुलाच्या समाजशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेचे फोटो ट्विटरवर टाकले होते. या प्रश्नपत्रिकेत रामायण, महाभारतातले प्रश्न विचारलेले दिसत आहेत.

 

Exit mobile version