दोन दिवसांपूर्वी झालेला अबुधाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ड्रोन हल्याचा सौदी अरब सैन्याने काही तासातच बदला घेतला.
हुथी बंडखोरांचा टॉप कमांडरचा सौदीच्या सैन्याने खात्मा केला आहे. विमानतळावर झालेल्या ड्रोन हल्ल्याच सौदीने दिलेले हे उत्तर मानले जात आहे.
अरब सैन्याच्या लढाऊ विमानांनी त्याच मध्यरात्री थेट येमेनची राजधानी असलेल्या सानाच्या उत्तरेकडील भागात घुसून भीषण हवाई हल्ले केले. या हल्ल्यात हुथी बंडखोरांचा टॉप कमांडर मेजर जनरल अब्दुल्लाह कासीम अल जुनैदचा खेळ खल्लास झाला आहे. सौदीच्या या हल्ल्यात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या भागात सौदीने हल्ला केल्यानंतर एकच हलकल्लोळ उडाला असून बचावकार्यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरब वृत्तवाहिनीनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
दहशतवादी संघटना हुथीने सोमवारी अबुधाबी विमानतळावर ड्रोनच्या साहाय्याने भयंकर स्फोट घडवले होते. या स्फोटात दोन भारतीयांसह एक पाकिस्तानी नागिरक ठार झाला होता. या हल्ल्याचा संयुक्त अरब अमिरातीसह भारत व इतर देशांकडून तीव्र निषेध केला जात आहे.
हल्ल्यात प्राण गमावलेल्या दोन भारतीयांची ओळख पटवण्यात आली असून, त्यांचे मृतदेह भारतात पाठवण्याची प्रक्रिया सुरु आहे. अशी माहिती युएईतील भारतीय दूतावासाने दिली आहे. मरण पावलेल्या दोन्ही भारतीयांच्या कुुटुंबाना लागेल ती सर्व मदत करणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.
हे ही वाचा:
जगातील सर्वात वयोवृद्धाचा वयाच्या ११२ व्या वर्षी मृत्यू…
अपहरण झालेला ‘डुग्गू’ अखेर सापडला
महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी भाजपाची दक्षता समिती
अरब सैन्याने सलग २४ तास हवाई हल्ले सुरु ठेवून हुथी बंडखोरांचा बिमोड करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे हुथी बंडखोरांचे धाबे दणाणले आहेत. येमेनमध्ये मागील सहा वर्षपासून गृहयुद्धाचा भडका उडाला आहे. त्यामुळे युएईने हुथी बंडखोरांविरुद्ध लष्करी कारवाई करण्यास सुरवात केली आहे.