सौदी अरेबियाने भारतासह १४ देशांच्या व्हिसावर घातली बंदी; कारण काय?

सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने घेतला निर्णय

सौदी अरेबियाने भारतासह १४ देशांच्या व्हिसावर घातली बंदी; कारण काय?

सौदी अरेबियाने मोठा निर्णय घेत १४ देशांच्या तात्पुरत्या व्हिसावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये उमरा, व्यवसाय आणि कुटुंब व्हिसावर बंदी घालण्यात आली आहे. सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. हे निर्बंध जूनपर्यंत कायम राहणार असून ज्यांच्याकडे उमरा व्हिसा आहे ते १३ एप्रिलपर्यंत सौदी अरेबियात प्रवेश करू शकणार आहेत.

हज यात्रेच्या वेळी गर्दी होत असल्याने सौदी अरेबिया सरकारने गर्दी नियंत्रित करण्यासाठी ही बंदी घातली असल्याचे बोलले जात आहे. ही बंदी जूनच्या मध्यापर्यंत लागू करण्यात आली आहे. म्हणजेच हज यात्रा संपेपर्यंत ही बंदी लागू राहील. या १४ देशांमध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, इजिप्त, इंडोनेशिया, इराक, नायजेरिया, जॉर्डन, अल्जेरिया, सुदान, इथिओपिया, ट्युनिशिया, येमेन आणि मोरोक्को यांचा समावेश असून या देशांवर ही बंदी घालण्यात आली आहे. योग्य नोंदणीशिवाय हज करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना रोखण्यासाठी सौदी अरेबिया सरकारने हे पाऊल उचलल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या निर्णयाचा मुख्य उद्देश म्हणजे गेल्या वर्षीच्या हज दुर्घटनेची पुनरावृत्ती रोखणे आहे.

गेल्या वर्षी तीव्र उष्णतेमुळे आणि नोंदणी नसलेल्या यात्रेकरूंच्या मोठ्या संख्येने उपस्थितीमुळे चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेत किमान १,२०० यात्रेकरू मृत्युमुखी पडले होते. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी यावर्षी व्हिसा नियम कडक करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिल्यानंतर ही बंदी घालण्यात आली आहे.

हे ही वाचा..

“मला तुरुंगवासही होऊ शकतो” ममता बॅनर्जी असं का म्हणाल्या?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लठ्ठपणाबाबत व्यक्त केली चिंता

वक्फ विधेयकाचे समर्थन केले, भाजपा नेत्याचे घर पेटवले

भूकंपापूर्वीच इशारा देईल ‘भूदेव’ अ‍ॅप

उमराह व्हिसा असलेले लोक १३ एप्रिलपर्यंत सौदी अरेबियात प्रवेश करू शकतात. अहवालात म्हटले आहे की ही बंदी आवश्यक होती कारण अनेक परदेशी नागरिक उमराह किंवा व्हिजिट व्हिसावर सौदी अरेबियात येतात आणि दीर्घकाळ देशात राहतात. हेच लोक मग मक्कामध्ये बेकायदेशीरपणे हजमध्ये सहभागी होतात, जिथे गर्दी वाढते आणि गोंधळ होतो.

राज ठाकरेंकडून तरी शिका... | Dinesh Kanji | Raj Thackeray | Marathi | MNS|

Exit mobile version