सौदी अरबमध्ये तब्लिघी जमातवर बंदी

सौदी अरबमध्ये तब्लिघी जमातवर बंदी

सौदी अरेबिया सरकारने इस्लामिक दहशतवादाच्या विरोधात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तब्लिघी जमात आणि दावाह या दोन कट्टरतावादी संघटनांवर सौदी सरकारने बंदी घातली आहे. सौदी अरब सरकारच्या इस्लामिक मंत्रालयाने या संबंधीच्या सूचना जारी केल्या आहेत. तब्लिघी जमात आणि दावाह या दोन्ही संघटना दहशतवादाचे एक द्वार खुले करणाऱ्या असल्याचे सौदी सरकारचे म्हणणे आहे.

सौदीच्या इस्लामिक मंत्रालयाने देशातील मशिदींना या संदर्भातील सूचना दिल्या आहेत. मशिदीतील मौलवींनी या बाबत फतवा काढावा आणि सरकारच्या या निर्णयिबद्दल स्थानिकांना माहिती द्यावी असे सौदी अरबच्या इस्लामिक मंत्रालयाने म्हटले आहे. त्यांनी समाज माध्यमांचा वापर करूनही आपला निर्णय जाहील केला आहे. सौदी अरबच्या इस्लामिक मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटल खात्यावरून या संदर्भात ट्विट करत माहिती देण्यात आली आहे.

सरकारने मशिदीतील मौलवींना असे सुचित केले आहे की त्यांनी नागरिकांमध्ये या संदर्भातील जनजागृती करावी. या संघटनेचा धोका आणि कशाप्रकारे ही संघटना दहशतवादाचे एक द्वार आहे हे नागरिकांना पटवून द्यावे. तसेच या संघटनांनी इतिहासात केलेल्या चुकांची माहिती जनतेला करून द्यावी. तर समाजाला त्यांच्यापासून असलेला धोका अधोरेखित करावा असे सौदी सरकारचे म्हणणे आहे.

सौदी सरकारच्या या निर्णयानुसार सौदीचे रहिवासी असलेल्या कोणत्याही नागरिकास तब्लिघी जमात आणि दावाह या संघटनांशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवण्यास सक्त मनाई असणार आहे. कोणी तसे करताना आढळल्यास ती व्यक्ती कारवाईस पात्र ठरणार आहे.

Exit mobile version