जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या ख्रिसमसला या वर्षी अमेरिकेत मात्र वेगळेच स्वरूप आले होते. नाताळात महत्त्वाचा असणारा सांता यावर्षी रस्त्यावरून जवळपास अदृश्य झाल्याचे चित्र होते. रस्त्यावर उभे राहून लोकांना नाताळाच्या शुभेच्छा देणारे सांता यंदा कमी होते. कोरोना आणि ओमिक्रोन बाधितांची वाढती संख्या हेही एक सांता कमी दिसण्याचे महत्त्वाचे कारण होते. शहरांमधील मॉल बंद असल्यामुळेही सांता कमी दिसत होते. तर, महामारीच्या कालावधीत काही सांतांचा मृत्यू झाल्याचे अहवालातून समोर आले आहे.
अमेरिकेमधील सांतांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना ‘द इंटरनॅशनल ब्रदरहुड ऑफ रिअल बियर्डेड सांतास’ (IBRBS), यांच्या या वर्षी ५५ सांतांचे मृत्यू झाल्याचे वृत्त ‘इंडिपेंडंट’ने दिले आहे. इतर काही संघटनांनी, गटांनीही कोरोना सारख्या महामारीमुळे सांतांचा मृत्यू झाल्याचे नोंदवले आहे. तसेच काही सांतांचा त्यांच्या वृद्धत्वामुळे मृत्यू झाल्याची नोंद केली गेली.
हे ही वाचा:
… म्हणून गोपीचंद पडळकरांनी महाराष्ट्र पोलिसांचा नाकारला अंगरक्षक
रेल्वे स्थानकासमोर विकत होते गांजा; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
राज्यात ओमिक्रोन रुग्णांची संख्या शंभरी पार
पंतप्रधान मोदींनी मुलांसाठी केली ही घोषणा
‘सांतास लास्ट राईड’चे संस्थापक कार्लो क्लेम म्हणाले की, या वर्षी त्यांना माहित असलेल्या ३३० सांतांचा मृत्यू झाला आहे. कोविड- १९ मुळे सांतासमधील मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. IBRBS चे संस्थापक स्टीफन अरनॉल्ड म्हणाले की, संस्थेशी संबंधित सुमारे १ हजार ९०० सांता हे कोरोनाचा अधिक धोका असलेल्या संस्थांशी निगडीत होते किंवा ते स्वतः आजारी होते.
२०२१ मध्ये मागणीत २० टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद IBRBS आणि इतर संघटनांनी केली आहे. आमच्या कोणत्याही सांताला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पूर्वीच्या ठिकाणी जाणे सोयीचे नव्हते, असे मॉल ऑफ अमेरिका येथील ‘सांता एकस्पेरियंस’चे मालक लँडो ल्यूथर म्हणाले. ‘कोविड- १९’ हीच मुख्य चिंता असल्याचेही त्यांनी म्हटले. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या महामारीतून सावरत असणाऱ्या जगात ओमिक्रोनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ख्रिसमसचा उत्साह फिका पडला.