शिंजियांग प्रांतातील उइघर मुस्लिमांचा नरसंहार केल्याप्रकरणी अमेरिका, ब्रिटन आणि युरोपियन युनियन यांनी चीनवर निर्बंध लादले आहेत. मानवी हक्कांचा भंग केल्यामुळे चीनच्या काही अधिकाऱ्यांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. चीनने देखील आता या निर्बंधांना उत्तर म्हणून या देशांवर निर्बंध लादले आहेत.
अमेरिकेचे नवीन अध्यक्ष जो बायडन यांच्या नेतृत्वात बिजिंगविरूद्ध ही पहिली समन्वित पाश्चात्य कारवाई होती आणि या निमित्ताने काही दशकांत प्रथमच युरोपियन युनियनने चीनविरूद्ध निर्बंध लादले आहेत.
सोमवारी युरोपियन युनियनने ब्रिटेन आणि कॅनडाने लादलेल्या निर्बंधानंतर शिंजियांगमधील मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली चार चिनी अधिकाऱ्यांवर निर्बंध लादले, यामध्ये प्रमुख सुरक्षा संचालकांचाही समावेश आहे.
हे ही वाचा:
सचिन वाझेचे बनावट आधार कार्ड ताब्यात
संपुर्ण व्याजमाफी देणे अशक्य; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
दूध का दूध, पानी का पानी होईलच – गिरीश बापट
भाजपाची सत्ता येताच भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकणार
चीनमध्ये शिंजियांग प्रांतातील अनेक उइघर मुस्लिमांना चीनच्या कम्युनिस्ट सरकारने छळछावण्या उभारून त्यात डांबल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपग्रहांच्या सहाय्याने या छळछावण्यांचे अस्तित्व जगाला कळले होते. तसेच या छळछावण्यांमधून बाहेर पडलेले उइघर मुस्लिम आणि त्या छळछावण्यांमधील सुरक्षा रक्षक यांच्या साक्षींमधूनही धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.
या काही साक्षीदारांनी या छळछावण्यांमध्ये उइघर महिलांवर बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या घटना सर्रास होत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या सर्व धक्कादायक प्रकारामुळेच सर्व पाश्चात्य राष्ट्रांनी चीनवर आता निर्बंध लादले आहेत.