तिन्ही सेनाप्रमुखांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कारगिल शहीदांना केला सॅल्युट!

तिन्ही सेनाप्रमुखांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कारगिल शहीदांना केला सॅल्युट!

भारतीय नागरिकांसाठी ‘कारगिल विजय दिवस’ महत्वाचा मानला जातो. हे युद्ध लडाखच्या कारगिलमध्ये एकूण ६० दिवस चालू होते. २६ जुलै रोजी या युद्धाचा शेवट झाला असून, युद्धावेळी भारतीय लष्करानं पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलवून लावलं होत. या युद्धात भारताचा विजय झाला असून, युद्धात शहिद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा दिवस देशभर साजरा केला जातो. तसेच देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

यंदा कारगिल विजयाला २३ वर्ष पूर्ण झाली असून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या सोबत तिन्ही लष्कर प्रमुखांसह राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी गाजवलेले शौर्य आणि त्यासाठी केलेले प्राणार्पण भारताच्या इतिहासात नेहमीच एक निर्णायक क्षण म्हणून कोरले जाईल. असे भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. भारतीय लष्कर राष्ट्राची अखंडता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि राहील, असे उद्गार भारताचे लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी केले.

हे ही वाचा:

सिव्हील इंजिनिअर डिप्लोमा केलेल्यांना कंत्राटदार नोंदणीसाठी हिरवा कंदील

शिवसेना म्हणजे ठाकरे अँड सन्स…

‘खोबरे गेले करवंटी हातात राहिली आतातरी शहाणे व्हा’

आक्षेपार्ह फोटो प्रकरणी अभिनेता रणवीर विरोधात गुन्हा दाखल

 

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्यासह तीनही लष्करप्रमुख आणि संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक, नवी दिल्ली येथे शहीद वीरांना श्रद्धांजली वाहिली. देशभरात विविध कार्यक्रम ‘कारगील विजय दिना’ निमित्त होत असतात. २३ व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या कलाकारांनी नॅशनल वॉर मेमोरियल येथील सार्वजनिक प्लाझा येथे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा गौरव करणारा ‘कारगिल एक शौर्य गाथा’ हा स्टेज शो सादर केला. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या विद्यार्थ्यांनी उत्तम कला सादर करून मान्यवर चमकदार कामगिरीने पूर्णपणे मंत्रमुग्ध झाले.

Exit mobile version