ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष आणि मुस्लीम धर्मगुरू मौलाना मोहम्मद साजिद रशिदी नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता रशिदी इतिहासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत नव्याने गरळ ओकली आहे.
आपण मुघलांचे वारसदार आहोत, या थाटात बोलताना रशिदी म्हणाले की, गुजरातमधील सोमनाथ मंदिर तोडून मोहम्मद गझनवीने कोणतीही चूक केलेली नाही. मुघलांचा धर्माशी काहीही संबंध नाही. गझनवीने सोमनाथ मंदिरात होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्याचेच काम केले असेही रशीद यांनी म्हटले आहे.
मौलाना साजिद रशिदी पुढे म्हणाले की, गझनवीने धर्माच्या नावावर कोणतेही काम केलेली नसल्याची अशी अनेक उदाहरणे समोर आली आहेत. मात्र, महमूद गझनवीने सोमनाथ मंदिर तोडले असे लोक म्हणतात. श्रद्धेच्या नावाखाली देवी-देवतांच्या नावाने काय चालले आहे. तिथे मुलींना कसे गायब केले जात होते हे तिथल्या लोकांनी गझनवीला सांगितल्याचा इतिहास आहे.
मेहमूद गझनवी हा जणू काही दयेचा सागर होता अशा अर्थाने मौलाना म्हणाले , यानंतर गझनवीने तेथे जाऊन मंदिर परिसराची पाहणी केली असता लोकांनी केलेल्या तक्रारी खऱ्या असल्याचे दिसून आले. तेव्हा त्याने सोमनाथ मंदिरावर हल्ला केला. सोमनाथ मंदिर तोडून त्याने कोणतीही चूक केली नाही. त्याने असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्याचे काम केले. रशिदी यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानचे डोळे उघडले? म्हणतात, भारताशी तीन युद्धे केल्यामुळे झालो गरीब
जोशीमठमधील हॉटेलनंतर आता घरे पाडण्याचा निर्णय
पाकिस्तानात १३ वर्षांच्या हिंदू मुलींना पळवून होत आहेत विवाह, धर्मांतरण
महाराष्ट्राला मिळाली भरभक्कम गुंतवणूक
साजिद रशिदी म्हणाले की, तो मुघलांचा काळ होता. या ८०० वर्षांत सर्व मुघल सम्राट होते किंवा इतर सम्राट होते. त्याचा इतिहास वाचला तर त्याचा धर्माशी काहीही संबंध नव्हता. याआधीही मौलाना साजिद रशिदी यांनी राममंदिराबाबत वादग्रस्त विधान केले होते. आमच्या भावी पिढ्या राम मंदिर पाडून मशीद बांधतील. आज मुस्लीम शांत आहेत. मात्र, येत्या काळात इतिहास लिहिला जाईल असे वादग्रस्त विधान रशीद यांनी केले होते.