परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ताजिकिस्तान भेटीवर

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ताजिकिस्तान भेटीवर

सध्या तीन दिवसांच्या ताजिकिस्तान दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे या दौऱ्यादरम्यान ‘हार्ट ऑफ एशिआ- इस्तंबूल प्रोसेस’ या अफगाणिस्तानवरील बैठकीत सहभाग घेणार आहेत. ही बैठक ताजिकिस्तानातल्या दुशांबे येथे होणार आहे.

जयशंकर या बैठकीत ताजिकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या संयुक्त निमंत्रणानंतर भाग घेणार आहेत. या वेळेला ते इतरही देशांच्या नेत्यांना भेटणार आहेत.

हे ही वाचा:

सोमवारी महाराष्ट्रात आढळले ३१,६४३ नवे कोरोना रुग्ण

संघाच्या ‘रोटी डे’ उपक्रमामुळे अनेक गरजवंतांची होळी झाली सुखाची

राज्यातील सर्वच पोलीस स्टेशन बनल्येत वसुलीचे अड्डे

या बैठकीसमोरचा प्रमुख प्रश्न अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करणे हा आहे. सध्याच्या घडीला हा आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. यासाठी एस. जयशंकर यांनी सोमवारी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घानी यांची देखील भेट घेतली. या भेटीदरम्यान अफगाणिस्तान शांतता प्रक्रियांबाबत त्यांच्यात चर्चा झाली.

या बैठकीत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहबूब कुरेशी देखील आले आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची पण बैठक होणार का अशी उत्सुकता निर्माण झाली आहे. परंतु अशी कोणतीही भेट नक्की झाली नसल्याचे कुरेशी यांनी स्पष्ट केले आहे.

भारत ताजिकिस्तान मध्ये एक महामार्ग बांधत आहे. सीमा सडक संघटन (बीआरओ) मार्फत बांधल्या जाणाऱ्या या रस्त्याला देखील जयशंकर यांनी भेट दिली. याबाबत त्यांनी ट्वीट देखील केले आहे. त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे, दुशांबे- चोर्टुट महामार्गाला भेट दिली. बीआरओ करत असलेले हे आपल्या ग्रँटच्या मदतीने हे काम उत्तम रितीने सुरू आहे. ८ पदरी महामार्ग दुशांबे मधली गर्दी कमी करेल.

या पूर्वी त्यांनी दुशांबेमध्ये पोहोचल्याचे ट्वीट देखील केले होते.

Exit mobile version