दहशतवादावरून जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तानला सुनावले

जयशंकर यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला.

दहशतवादावरून जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तानला सुनावले

भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी शुक्रवार, ५ मे रोजी पणजी येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) परिषदेला संबोधित केले. यावेळी जयशंकर यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. भारत सीमेपलीकडील दहशतवाद सहन करणार नाही, असे त्यांनी पाकिस्तान, चीन आणि इतर उपस्थित देशांच्या प्रतिनिधींना ठणकावून सांगितले.

सर्वांनी मिळून दहशतवादाचा मुकाबला केला करायला हवा. अजूनही दहशतवादाचा पराभव होऊ शकलेला नाही आणि दहशतवादाशी लढणे हे आमचे पहिले प्राधान्य असल्याचे मत जयशंकर यांनी व्यक्त केलं.

सीमेपलीकडून होणारा दहशतवाद पूर्णपणे संपला पाहिजे. दहशतवादाचा निधी पूर्णपणे बंद झाला पाहिजे. करोनाच्या काळात संपूर्ण हाहाकार माजलेला असतानाही सीमेपलीकडून दहशतवादी कुरापती सुरूच होत्या, असे मत जयशंकर यांनी मांडले. यावेळी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो आणि इतर देशांचे परराष्ट्र मंत्री उपस्थित होते.

हे ही वाचा:

पाकिस्तानमधील शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ७ शिक्षकांचा मृत्यू

सुदानमधून ३,८०० भारतीय सुखरूप मायदेशी परतले 

मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?

इम्रान खान यांना धक्काबुक्की, पुन्हा पायाला दुखापत

दहशतवाद या मुद्द्यावरून दोन्ही देशांचे संबंध ताणलेले असताना पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर आले आहेत. पाकिस्तानच्या उच्चपदस्थ नेत्याने भारताला भेट देण्याची २०११ नंतर ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी २०११ मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खर भारतात आल्या होत्या. सध्या त्या पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री आहेत. त्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले होते. तर, २०१५ मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला भेट दिली होती.

Exit mobile version