एस. जयशंकर दोन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर

सातव्या हिंदी महासागर परिषदेत सहभागी होणार

एस. जयशंकर दोन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर शुक्रवारपासून हिंदी महासागराच्या विषयावर सुरू होणाऱ्या दोन दिवसीय परिषदेत सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे जाणार आहेत. हिंदी महासागरावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी चीनकडून प्रयत्न सुरू असताना ही परिषद होत आहे. जयशंकर हे श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग आणि सिंगापूरचे परराष्ट्र मंत्री विव्हियन बालकृष्णन यांच्यासोबत उद्घाटन सत्राला संबोधित करतील.

सन २०१६मध्ये सिंगापूरमधून सुरुवात झाल्यानंतर हिंदी महासागर परिषदेच्या भूमिकेला वजन प्राप्त झाले आहे. या परिषदेंतर्गत सर्व देशांच्या विकास आणि सुरक्षेसंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. या परिषदेत भविष्यातील सहकार्यावर आणि शक्यतांवर चर्चा केली जाईल.

चीनकडून हिंदी महासागरावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्याकडून विविध देशांशी संधान बांधून त्यांना कर्जे देऊन स्वतःच्या अमलाखाली आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे हिंदी महासागरात हे देश चीनबाबत काय भूमिका मांडतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

हे ही वाचा:

घोसाळकर गोळीबार : १० दिवसांपूर्वी मौरीसच्या पोस्टचा संबंध काय ?

उत्तराखंड: हल्द्वानीमध्ये ‘बेकायदेशीर’ मदरसा पाडल्यानंतर दगडफेक, वाहने पेटवली!

भारत-म्यानमार देशाचा ‘फ्री मूव्हमेंट रेजिम’ करार अखेर रद्द!

आपकडून आसाममध्ये तीन उमेदवार जाहीर

जयशंकर यांनी तत्पूर्वी भारतातील नामिबियाच्या दूतावासालाही भेट दिली. तसेच, नामिबियाचे राष्ट्रपती हेज गेनगॉब यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला. गेनगॉब यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दोन्ही देशांच्या संबंधांमधील विकास आणि त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन व नेतृत्वासाठी आम्ही त्यांचे सदैव आभारी राहू, अशा शब्दांत जयशंकर यांनी भावना व्यक्त केल्या.

Exit mobile version