रशियाचे ‘लुना-२५’ भारताच्या ‘चांद्रयान- ३’ च्या दोन दिवस आधी पोहचणार

लुना-२५ चंद्राच्या १०० किमी कक्षेत पोहचले

रशियाचे ‘लुना-२५’ भारताच्या ‘चांद्रयान- ३’ च्या दोन दिवस आधी पोहचणार

भारताची महत्त्वाकांक्षी अशी चांद्रयान- ३ ही मोहीम अंतिम टप्प्यात असून चांद्रयान मोहिमेसाठी गुरुवार, १७ ऑगस्ट हा महत्त्वाचा दिवस आहे. चांद्रयान- ३ चे प्रोपल्शन मॉड्यूल लँडरपासून वेगळे होणार आहे. तर, २३ ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान- ३ उतरणार आहे. दरम्यान, दुसरीकडे रशियाने सोडलेले ‘लुना-२५’ बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चंद्राच्या १०० किमी कक्षेत पोहचले आहे.

रशियाचे ‘लुना- २५’ हे चांद्रयान-3 च्या दोन दिवस अगोदर म्हणजे येत्या २१ ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरणार आहे. आतापर्यंत चंद्राच्या इक्वेटरवर सर्व मोहिमा यशस्वी झाल्या असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रथमच रशिया आणि भारताचे यान सॉफ्ट लँडिंग करणार आहे. त्यामुळे साऱ्या जगाचे लक्ष या दोन्ही देशांच्या यानाकडे आहे.

रशियाने १० ऑगस्ट १९७६ रोजी ‘लुना-२४’ पाठवले होते. त्या मोहिमेनंतर जवळपास पाच दशकांनंतर ‘लुना-२५’ या यानाने अवकाशात झेप घेतली आहे. ११ दिवसांत म्हणजे २१ ऑगस्टला रशियाचे यान चंद्रावर उतरणार आहे. हे यान अधिक शक्तीशाली आणि खर्चिक रॉकेटद्वारे चंद्राच्या दिशेने निघाले असून यानाच्या हलक्या वजनामुळे आणि इंधन साठवणुकीच्या क्षमतेमुळे कमी वेळेत हे यान चंद्राच्या कक्षात पोहचणार आहे.

भारताचे चांद्रयान- ३ हे कमी खर्चात चंद्रावर उतरणार आहे. यासाठी इस्रोने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर केला आहे. या प्रक्रियेत इंधनाची बचत होते, मात्र त्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे चांद्रयानाला चंद्रावर पोहोचण्यासाठी जास्त वेळ लागत आहे.

हे ही वाचा:

‘मेक इन इंडिया’मुळे मोबाईल उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर

दिल्लीवरून ‘इंडिया’मध्ये संघर्ष

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या टोल कर्मचाऱ्याला घेतले ताब्यात !

वांद्रे येथील व्हायरल व्हिडीओ प्रकरणी गुन्हा दाखल

भारताच्या चांद्रयान-३ ने आंध्रप्रदेशातील श्री हरिकोटा येथून १४ जुलै यशस्वी उड्डाण केले होते तर रशियाच्या यानाने भारतानंतर जवळपास महिन्याभरानंतर ११ ऑगस्ट रोजी सोयूज २.१ बी रॉकेटद्वारे अमूर ओब्लास्टच्या वोस्तानी कॉस्मोड्रोमवरुन उड्डाण केले होते.

Exit mobile version