युद्धाचे ढग गडद! रशियाचा युक्रेनवर ड्रोन हल्ला

युक्रेनची राजधानी कीव्ह आणि इतर शहरांवर रशियाचा ड्रोन हल्ला

युद्धाचे ढग गडद! रशियाचा युक्रेनवर ड्रोन हल्ला

रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये वर्षाहून अधिक काळापासून युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांमधील परिस्थिती निवळण्याची चिन्ह दिसत नसताना युक्रेनची राजधानी कीव्ह आणि इतर शहरांवर रशियाने ड्रोन हल्ला केला.

कीव्हवर गेल्या आठ दिवसांत केलेला हा चौथा हल्ला आहे. रशियाने इराणनिर्मित ६० ड्रोनच्या साहाय्याने हल्ला केला. ३६ ड्रोन हवेतच नष्ट केल्याची माहिती युक्रेनकडून देण्यात येत आहे. रशियाने केलेल्या या हल्ल्यात पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे.

रशियाने युक्रेनच्या उत्तर, दक्षिण आणि पूर्व भागातील १२७ ठिकाणी हल्ले केल्याचे युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले. रशिया मागील काही महिन्यांपासून हल्ल्यांसाठी इराणनिर्मित ड्रोनचा वापर करत आहे.

हे ही वाचा:

सीरम इन्स्टिट्यूटच्या संचालकांची मालमत्ता ईडीकडून जप्त, ‘या’ प्रकरणात केली कारवाई

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन

मेक इन इंडियाची भरारी!! पहिले एअरबस C295 भारताच्या ताफ्यात येणार

सागरी जगभ्रमणासाठी आता मोहिमेवर निघणार नौदलाची महिला अधिकारी

दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा रशियाने केलेल्या पराभवाची आठवण म्हणून रशियामध्ये ९ मे हा दिवस ‘व्हिक्टरी डे’ संचलनाचे आयोजन करण्यात येते. मात्र, युक्रेननेकडून होत असलेले प्रतिहल्ले लक्षात घेता आणि काही दिवसांपूर्वीच मॉस्कोमध्ये झालेला ड्रोन हल्ला लक्षात घेऊन रशियातील २१ शहरांनी ‘व्हिक्टरी डे’ संचलन रद्द केले आहे.

Exit mobile version