गेल्या अडीच महिन्यापासून रशिया युक्रेनचे युद्ध सुरु आहे. रशियाने सुमी आणि चेर्निहाइव्हमध्ये हल्ले सुरू केले आहेत. चेर्निहाइव्हमध्ये रशियन हल्ल्यात आठ जण ठार झाल्याचे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दुसरीकडे रशियन सैन्याने सुमीमध्येही मिसाईल हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. पुतिन यांच्या सैन्याने युक्रेनमध्ये पहिला मोठा विजय मिळवला आहे. ८३ दिवसांत प्रथमच, रशियाने एक मोठे युक्रेनियन शहर ताब्यात घेतले आहे. या गोष्टीला आता युक्रेननेही दुजोरा दिला आहे.
अखेर रशियन सैन्याने मारियुपोल शहरावर ताबा मिळवला आहे. युक्रेनने जवळपास तीन महिन्यांच्या संघर्षानंतर पराभव स्वीकारला आहे. युक्रेनने मारियुपोलमधील आपली लढाऊ मोहीम बंद केल्याची घोषणा केली आहे. आता रशियन सैनिकांनाही शहरातून बाहेर काढण्यात येत असल्याचे वृत्त आहे.
मारियुपोलवर रशियाचे नियंत्रण आल्याने युद्धाचा शेवटही अपेक्षित आहे. अनेक दिवसांपासून रशियाच्या जोरदार बॉम्बहल्ल्यांना तोंड देत असलेले मारियुपोल उद्ध्वस्त झाले आहे. या युद्धात मारियुपोलचे हजारो लोक मारले गेल्याचा दावा युक्रेनने केला आहे.
अखेर युक्रेनने मारियुपोलमधील आपली लढाऊ मोहीम बंद केल्याची घोषणा केली आहे. मारियुपोल हे धोरणात्मकदृष्ट्या युक्रेनचे महत्त्वाचे शहर आता पूर्णपणे रशियन सैन्याच्या ताब्यात आहे. रशिया आणि पुतिन यांच्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या हा मोठा विजय आहे कारण शहराचे भौगोलिक स्थानही महत्त्वाचे आहे.
हे ही वाचा:
पहिल्यांदा तक्रार करू…पण कारवाई झाली नाही तर सोडणार नाही
आता सिमेंट क्षेत्रात ‘अदानी पॉवर’
आरेमधल्या झाडांसाठी लढणाऱ्या शिवसेनेची वाशीमधल्या झाडांसाठी चुप्पी
…म्हणून भारताच्या नकाशात दिसतो श्रीलंका!
दरम्यान, मारियुपोलमधील अझोव्हस्टल स्टील प्लांटमधील अझोव्ह बटालियनच्या सैनिकांनी सोमवारी रात्रीच रशियन सैन्यासमोर आत्मसमर्पण करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत २५० हून अधिक जवानांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यांनी आपली शस्त्रे खाली ठेवली आहेत. मंगळवारीही आत्मसमर्पण प्रक्रिया सुरूच होती. पुक्रेनच्या उपमंत्र्यांनी याला दुजोरा दिला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले की, सैनिक जिवंत राहणे अधिक महत्त्वाचे आहे.