रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील युरोपचे सर्वात मोठे स्टील प्लांट उद्ध्वस्त

रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील युरोपचे सर्वात मोठे स्टील प्लांट उद्ध्वस्त

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज २५ वा दिवस आहे. रशियन सैन्याच्या हल्ल्याने युक्रेन उद्ध्वस्त झाले आहे. युक्रेनमधील मोठे कारखाने उद्ध्वस्त झाले आहेत. यामध्ये रशियन सैन्याने युरोपातील सर्वात मोठ्या स्टील प्लांटवरही हल्ला झाला आहे.

युक्रेनचे मारियुपोल शहर हे रशियन हल्ल्यात उद्ध्वस्त झाले आहे. रशियन सैन्याने शहराला वेढा घातला आहे. मारियुपोल येथील युरोपातील सर्वात मोठा लोह आणि पोलाद अझोव्स्टल कारखाना उद्ध्वस्त झाला आहे. या प्लांटमधून धुराचे लोट उठत आहेत. युक्रेनचे खासदार लेस्या वासिलेंको यांनी स्टील प्लांटच्या विध्वंसाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. व्हिडिओमध्ये इमारतींचा स्फोट झाला आणि तपकिरी आणि काळ्या धुराचे लोट उठताना दिसत आहेत. रशियन सैन्याने स्टीलचा कारखानाच नष्ट केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

ट्विटमध्ये वासिलेंको यांनी, ” युरोपातील सर्वात मोठ्या लोह आणि पोलाद प्लांटच्या नाशामुळे युक्रेनला केवळ मोठा आर्थिक फटका बसला नाही. तर पर्यावरणाचेही मोठे नुकसान झाले आहे.”

अझोव्स्टल प्लांटचा मालक रिनाट एखमेटोव्ह आहे, जो युक्रेनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती मानला जातो. कारखान्याच्या संचालकांनी सांगितले की, ‘आम्ही शहरात परत येऊ आणि प्लांटची दुरुस्ती करू आणि ते पुन्हा व्यवस्थित सुरु करू. मात्र, प्लांटचे किती नुकसान झाले हे त्यांनी सांगितले नाही.’

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींची जपानच्या पंतप्रधानांना ‘कृष्ण पंखी’ भेट

आर आर आर चित्रपटाची टीम पोहोचली स्टॅच्यू ऑफ युनिटीला

अगदी लवकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मुलावर फसवणुकीचा गुन्हा

दरम्यान, आज रशियन सैन्याने मारियुपोल शहराला वेढा घातला आहे. या शहरात रशियन सैन्याने खूप नुकसान केले. मारियुपोल शहरातील एका शाळेच्या इमारतीवर रशियन सैन्याने बॉम्ब टाकला. या हल्ल्यात शाळेचेही मोठे नुकसान झाले आहे.

Exit mobile version