कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना भारताला करावा लागत आहे. देशभरात दररोज तीन लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर, व्हेंटिलेटर्सच्या तुटवड्याला भारताला सामोरं जावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं काही दिवसांपूर्वी रशियाच्या स्पुतनिक व्ही या लसीला भारतात मंजुरी दिली आहे. स्पुतनिक व्ही लसीची पहिली खेप भारतला १ मे रोजी मिळेल, अशी माहिती रशिया डायरेक्ट इनवेस्टमेंट फंडचे प्रमुख किरील दिमित्रिक यांनी दिली आहे.
रशियानं भारताला कोरोना लस पुरवठ्याबाबत करार केला आहे. त्यानुसार एका वर्षात भारताला लसीचा पुरवठा होणार आहे. रशियानं पाच भारतीय उत्पादकांशी याबाबत करार केला आहे. रशिया डायरेक्ट इनवेस्टमेंट फंडचे प्रमुख दिमित्रिक यांच्या माहितीनुसार ५० दशलक्ष डोस येत्या काही दिवसात भारताला दिले जातील. स्पुतनिक व्ही लसीचे भारताला ८.५ कोटी डोस मिळण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
कोलकाता नाइट रायडर्सचे ‘इशारों इशारों में’
कोरोना झाला तर ‘या’ कंपनीत २१ दिवसांची पगारी सुट्टी
देवेंद्र फडणवीसांचे ज्युलिओ रिबेरोंना खुले पत्र
भारताला कोरोना विषाणू संसर्गातून थोडा दिलासा मिळाला आहे.गेल्या २४ तासांमध्ये भारतात ३ लाख २३ हजार १४४ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर २ हजार ७७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसभरात २ लाख ५१ हजार ८२७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.