रशियाच्या प्रशासनाने महिनाभरात देशभरातून सहा पत्रकारांना अटक केली आहे. त्यातील एक पत्रकार रशियाचे विरोधी पक्षनेते अलेक्झी नॅव्हलॅनी यांच्यावरील खटल्यांचे गेल्या काही वर्षांपासून वार्तांकन करत होता, अशी माहिती प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स संघटनेने गुरुवारी केली.
अँटोनिया फेवरोस्काया यांच्यावर नॅव्हल्नी यांच्या अँटी करप्शन फाऊंडेशनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून ‘कट्टरवादी संघटने’त सहभागाचा आरोप केला आहे, असे रशियन मानवाधिकार गट ओव्हीडी-इन्फो यांनी दिली आहे. नॅवल्नी यांचा फेब्रुवारीत मृत्यू झाला होता. फाव्होरस्काया या नॅव्हल्नी यांच्या न्यायालयातील खटल्यांवरील सुनावणीचे वार्तांकन करत होत्या. नॅवल्नी यांचा मृत्यू होण्यापूर्वी त्यांचे शेवटचे चित्रिकरणही त्यांनी केले होते.
हे ही वाचा:
कथित खिचडी घोटाळयाप्रकरणी अमोल कीर्तीकरांना ईडीचे दुसरे समन्स
डीपफेक हे मोठं आव्हान; एआय जनरेटेड गोष्टींवर वॉटरमार्क हवा
दक्षिण आफ्रिकेतील बस अपघातात ४५ प्रवासी ठार
विरोधी पक्षातील व्यक्ती, पत्रकार, कार्यकर्ते आणि एलजीबीटीक्यू समुदायाच्या सदस्यांना उद्देशून असलेल्या रशियामधील असंतोषांविरुद्ध व्यापक कारवाईचा भाग म्हणून अधिकाऱ्यांनी लक्ष्य केलेल्या अनेक रशियन पत्रकारांपैकी त्या एक आहेत. तर, अन्य दोन पत्रकारांची नावे अलेक्झांड्रा आणि ऍनास्टेशिया मुसाटोव्हा अशी आहेत. हे दोघे फेव्हरोस्काया यांची भेट घेण्यासाठी डिटेन्शन सेंटरमध्ये आले असता त्यांनाही ताब्यात घेण्यात आल्याचे रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स संघटनेने नमूद केले आहे. त्यांच्या घरांवरही छापा टाकण्यात आला असून त्यांची उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
फेव्हरोस्कायाच्या घराचा शोध सुरू असताना वार्तांकन करताना रशियन न्यूजसाइट सोटाव्हिजनचे एकाटेरिना एनिकिविच आणि रसन्यूज या कोन्स्टान्टिन यारोव्ह यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याकोव्ह यांना पोलिसांनी मारहाण केली आणि लैंगिक हिंसाचाराची धमकी देऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले, असा दावा संघटनेने केला आहे. पोलिसांचा अनादर केल्याचा ठपका यारोव्ह यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तर, रशन्यूजच्या ओल्गा कोमलेव्हा या महिला पत्रकारालाही ताब्यात घेण्यात आले आहे. तिच्यावरही कट्टरवादी संघटनेमध्ये सहभागाचा ठपका ठेवण्यात आला आहे.