युक्रेन आणि रशियन सैन्य यांच्यातील युद्धाला एक महिना उलटून गेला आहे. पण तरीही रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपण्याचे नाव घेत नाही आहे. रशियन सैन्याने युक्रेनमधील मारियुपोल थिएटरवर केलेल्या हवाई हल्ल्यात सुमारे तीनशे लोक ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या थिएटरमध्ये रशियाने हल्ला केल्यापासून शेकडो लोक आश्रयासाठी होते.
रशियन सैन्य युक्रेनच्या भूमीवर हल्ले करत आहे, तर प्रत्युत्तर म्हणून युक्रेनचे सैनिकही आघाडीवर आहेत. १६ मार्च रोजी रशियन सैन्याने युक्रेनियन बंदर शहर मारियुपोलमधील थिएटरवर शक्तिशाली बॉम्ब टाकला होता. त्यात या नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या थिएटरमध्ये लहामुलांसह साधारण एक हजाराहून अधिक नागरिकांनी आश्रय घेतला होता. मारियुपोल थिएटरवर झालेल्या हल्ल्याचे वृत्त न्यूज एजन्सी एएफपीने दिले आहे. गेल्या महिनाभरापासून रशियन सैन्य युक्रेनमध्ये तळ ठोकून आहे. अनेक वेळा रशिया युक्रेनमध्ये चर्चा होऊनही युद्धविराम मिळवण्यात यश आलेले नाही.
रशियन सैन्याकडून युक्रेवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले जात आहेत. रशियन सैन्य हायपरसॉनिक क्षेपणास्त्रानंतर आता युक्रेनवर हल्ला करण्यासाठी फॉस्फरस बॉम्बचा वापर सुरू केला आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी दावा केला की, रशियन सैन्याने अनेक भागांवर फॉस्फरस बॉम्बने हल्ला केला आहे.
हे ही वाचा:
“मैं आदित्यनाथ योगी…” दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्री म्हणून शपथ
आमदारांना मुंबईत घरे मिळणार, पण…
आयकर विभागाने पाठवली पालिका आयुक्त चहलना नोटीस
MPSC २०१९चा निकाल जाहीर झाला; पुण्याचा निलेश बर्वे पहिला
दुसरीकडे, अमेरिकेने आता रशियाकडून रासायनिक शस्त्रे वापरण्याची शक्यता व्यक्त केली आहे. रशिया आता युक्रेनमध्ये कधीही रासायनिक हल्ले करू शकतो, असे सांगण्यात आले आहे. मात्र, युक्रेनही प्रतिहल्ले करण्यात मागे पडत नाही आहे. युक्रेनने युरोपियन युनियनला निर्बंध लागू करण्यासाठी रशिया, बेलारूस सीमा बंद करण्याचे आवाहन केले आहे.