युक्रेन सरकारने केला दावा
युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरूच आहे. दरम्यान, रशियन हल्ल्यात आतापर्यंत ४० युक्रेनच्या सैनिकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय १० नागरिकांचाही मृत्यू झाला आहे तसेच अनेक जण जखमीही झाले आहेत, युक्रेनच्या अध्यक्षांच्या कार्यालयातून याबाबत अधिकृत माहिती दिली गेली आहे.
युक्रेनच्या विविध भागात रशियाचा हल्ला सुरूच आहे. आम्हीही प्रत्युत्तराची कारवाई करत असल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे. रशिया युक्रेनवर तीन बाजूंनी हल्ला करत आहे. यामध्ये युक्रेनच्या उत्तर, पूर्व आणि दक्षिणेकडून रशिया युक्रेन वर हल्ला करत आहे. युक्रेनने रशियाचे ५० सैनिक मारल्याचा दावा केला आहे.
"We will give weapons to anyone who wants to defend the country. Be ready to support Ukraine in the squares of our cities," says President of Ukraine Volodymyr Zelenskyy#RussiaUkraineCrisis pic.twitter.com/KKeINY8eGn
— ANI (@ANI) February 24, 2022
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले आहे की, जे युद्ध करण्यासाठी इच्छुक असलेल्यांना शस्त्रे दिली जाणार आहेत. प्रत्येक नागरिकावर युक्रेनचे भविष्य अवलंबून असल्याचेही राष्ट्राध्यक्ष म्हणाले आहेत.
युक्रेनने रशियाशी राजनैतिक संबंध तोडण्याची केली घोषणा
रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाशी राजनैतिक संबंध तोडले आहेत. रशियाने आपल्या शेजाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर झेलेन्स्की यांनी गुरुवारी रशियाशी संबंध तोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
रशियन सैन्याने युक्रेनची विमाने उध्वस्त केली असून यामध्ये पाच जण ठार झाले आहेत. आजच्या या रशिया युक्रेन लढ्यात दोन्ही देशांची मृत्यूची संख्या शंभरवर पोहचली असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा:
नवाब मलिक राजीनामा द्या! भाजपाचे आंदोलन…
रशिया युक्रेन युद्धामुळे शेअर बाजार, तेलकिमतींवर विपरित परिणाम
टिपूऐवजी राणी लक्ष्मीबाई! सत्ता तुमची, मागणी कसली करता लबाडांनो?
दरम्यान, नाटोचे सदस्य असलेल्या देशांनी रशियाला लष्करी कारवाई थांबवण्याचे आव्हान केले आहे. कारवाई सुरु ठेवल्यास परिणाम भोगण्याचा इशारा अमेरिकेसह युरोपातील अनेक देशांनी युक्रेनला दिला आहे.