रशिया झेलेन्स्कीवर हल्ला करण्याच्या तयारीत?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर देणार उत्तर

रशिया झेलेन्स्कीवर हल्ला करण्याच्या तयारीत?

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या हत्येचा कट उधळल्याचा दावा रशियाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. रशियाच्या सरकारी कार्यालयावर हल्ला करण्यासाठी सोडण्यात आलेले ड्रोन बुधवारी पाडण्यात आले. रशियाने या हल्ल्यासाठी युक्रेनला जबाबदार धरले असले तरी युक्रेनने हा दावा फेटाळला आहे. मात्र तरीही रशियन संसदेने या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्कीवर हल्ला करण्याचे आवाहन केले आहे.

‘सरकारी इमारतीच्या दिशेने येणारे, युक्रेनने पाठवलेले दोन ड्रोन हल्ला होण्याआधीच सुरक्षा रक्षकांकडून पाडण्यात आले. हा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मारण्याचा कट होता,’ असा आरोप रशियाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. ड्रोन हल्ल्याच्या प्रयत्नानंतर रशियाने युक्रेनवर प्रत्युत्तराची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

रशियन अधिकाऱ्यांनी बुधवारी युक्रेनवर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची हत्या करण्याच्या प्रयत्नात राजधानी शहरातील सरकारी इमारतीवर रात्री दोन ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. हल्ल्यानंतर, रशियन संसदेने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या निवासस्थानावर प्रत्युत्तरासाठी क्षेपणास्त्र हल्ला करण्याचे आवाहन केले.

हे ही वाचा:

लोकप्रभामध्ये असताना संजय राऊत शिवसेनेबद्दल काय लिहित असत?

‘गो फर्स्ट’च्या वैमानिकांची एअर इंडिया, इंडिगोच्या ‘कॉकपिट’वर नजर

आता घरी बसून पार्किंगची जागा ठरवा

पोलिसांकडून बळाचा वापर; पोलिस आणि कुस्तीपटूंमध्ये झटापट

रशियन प्रेसिडेन्शियल प्रेस सर्व्हिसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रशियावर ड्रोन हल्ला करण्याच्या प्रयत्नाला रशिया योग्य वेळी प्रत्युत्तर देण्यास तयार आहे. रशियाने या ड्रोन हल्ल्याला ‘पूर्वनियोजित कृत्य’ म्हटले असून रशियाच्या विजय दिनाच्या पूर्वसंध्येला हा हल्ला घडवून आणण्यात आला,’ असेही त्यांनी म्हटले आहे.

अध्यक्ष पुतिन सुरक्षित

घटनेवेळी व्लादिमिर पुतिन अध्यक्षीय कार्यालयात नव्हते. ते निवासस्थानातून कार्यरत होते, असे रशियन अध्यक्षीय कार्यालयाचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह यांनी सांगितले. पुतिन सुरक्षित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version