सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झालेल्या युक्रेन आणि रशिया युद्धाच्या शांतता चर्चेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनने युद्धबंदीला सहमती दर्शविल्याचे स्वागत केले. रशियाही याला सहमती देईल अशी आशा व्यक्त केली होती तसेच या युद्धात रशिया आणि युक्रेन दोन्हीचे सैनिक मारले जात आहेत असे सांगून ट्रम्प यांनी युद्धबंदी करणे खूप महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले होते. यानंतर आता रशियाला निर्णय घ्यायचा असून वाटाघाटीदरम्यान झालेल्या ३० दिवसांच्या युद्धबंदीचे पालन न केल्यास रशियाला आर्थिक परिणामांना सामोरे जावे लागू शकते, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, युक्रेनने सहमती दर्शवली असून आता जबाबदारी मॉस्कोची आहे, तसेच अमेरिकन अधिकारी करारावर चर्चा करण्यासाठी आणि व्यापक शांतता चर्चेसाठी रोडमॅप शोधण्यासाठी रशियाला जाणार आहेत. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी अपेक्षा व्यक्त केली की, मॉस्को युद्धबंदी करार स्वीकारेल. तसेच रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युद्धबंदी करार सादर करण्याचे काम अमेरिकन राजदूतांवर सोपवण्यात आले आहे. शिवाय, ट्रम्प यांनी इशारा दिला की जर रशियाने युक्रेनमध्ये लष्करी आक्रमण सुरू ठेवले तर त्याला गंभीर आर्थिक परिणामांना सामोरे जावे लागू शकते. असे काही उपाय आहेत ज्यांचा खूप नकारात्मक आर्थिक परिणाम होऊ शकतो, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. तो म्हणाला. रशियासाठी हे परिणाम विनाशकारी असतील पण ते नको असून माझे ध्येय शांतता प्राप्त करणे आहे, असेही तट्रम्प म्हणाले.
युक्रेनने अमेरिकेच्या पाठिंब्याने केलेल्या युद्धबंदीला आधीच सहमती दर्शवली असली तरी, रशियाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. अद्याप या प्रस्तावाचा अभ्यास केला जात आहे आणि निर्णय घेण्यापूर्वी अमेरिकन अधिकाऱ्यांकडून अधिक तपशीलांची वाट पाहत आहे, असे सांगण्यात येत आहे. रशियाच्या भूमिकेवर दबाव आणला असता क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सावध प्रतिक्रिया दिली आणि म्हटले की या विषयावर अमेरिकन प्रतिनिधींशी पुढील चर्चा आवश्यक आहे.
हे ही वाचा :
‘सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाउंडेशनविरोधातील वादग्रस्त पोस्ट हटवा!’
शिवाजी सावंत यांची ‘छावा’ कादंबरी आता इंग्रजीत !
ताजे काँग्रेसी टूलकिट जोडते, वक्फच्या मनमानीचा विकसित भारताशी संबंध…
पंतप्रधान मोदींनी गंगा तलावाचे घेतले दर्शन
युक्रेनने ३० दिवसांच्या युद्धबंदीच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला असून तीन वर्षांच्या युद्धानंतर रशियाशी वाटाघाटी करण्यास सहमती दाखवली आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या जाहीर वादानंतर, मंगळवार, ११ मार्च रोजी जेद्दाह येथे झालेली चर्चा ही दोन्ही देशांमधील पहिली अधिकृत बैठक होती. येथे युक्रेनियन प्रतिनिधींनी अमेरिकेचा प्रस्ताव स्वीकारला ज्यामध्ये तात्काळ ३० दिवसांचा युद्धविराम करण्याची मागणी करण्यात आली होती.