युक्रेनमध्ये रशियन हल्ल्याचा आज तिसरा दिवस असून दिवसेंदिवस या युद्धाची तीव्रता वाढत चालली आहे. या युद्धात आज युक्रेनची पहिली महिला पायलट ठार झाली आहे. आज पहाटे रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी कीवमध्ये प्रवेश केला आणि रस्त्यावर दंगल उसळली.
फायटर जेट पायलट नताशा पेरोकोव्ह हीचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे. रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात पायलट पेरोकोव्ह या गंभीर जखमी झाल्या होत्या त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. या हवाई हल्ल्यात अनेक इमारती, घरे उध्वस्त झाली आहेत. इमारतींमधून जखमी झालेल्या नागरिकांसाठी बचाव कार्य सुरु आहे.
रशियन सैन्यांनी कीवमध्ये प्रवेश केल्यावर स्थानिक अधिकाऱ्यांनी लोकांना लपून राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी देश सोडण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला आहे. आपण राजधानीतच राहणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
हे ही वाचा:
मराठा आरक्षणासाठी संभाजी राजे यांचे आझाद मैदानात उपोषण
युक्रेन हल्ल्याचा निषेध करणाऱ्या ठरावावर भारत तटस्थ
युक्रेनहून येणारे भारतीय ९ वाजता येणार भारतात
मराठा आरक्षणासाठी संभाजी राजे यांचे आझाद मैदानात उपोषण
दोन दिवसांपासून रशिया युक्रेन युद्धात शेकडो लोक जखमी झाले आहेत. रशियन सैन्य मिळेल त्या मार्गाने युक्रेनच्या दिशेने जात आहेत. तर काही रशियन सैनिकांना युक्रेन पोलिसांनी पकडले आहे. युक्रेनने दावा केला आहे की, आतापर्यंत युक्रेनने ३ हजार ६०० रशियन सैनिकांना ठार केले आहे. या युद्धसाठी जो बायडेन यांनी युक्रेनला तात्काळ लष्करी मदत केली आहे. या मदतीत युक्रेनला २६० कोटी डॉलर निधी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे तर अमेरिकेने रशियावर काही आर्थिक निर्बंध घातले आहेत. तसेच देशाचे संरक्षण करण्यासाठी युक्रेन नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.