रशिया- युक्रेन युद्धाला सुरुवात…

रशिया- युक्रेन युद्धाला सुरुवात…

गेल्या काही आठवड्यांपासून रशिया आणि युक्रेन देशांमध्ये तणावाचे वातावरण होते. अखेर आज सकाळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला केल्याची घोषणा केली. हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी रशियाने युक्रेनचे मोठे नुकसान केले आहे. काही तासांतच रशियन सैन्याने युक्रेनचे एअरबेस आणि हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केली आहेत. रशियाने युक्रेनच्या सीमेवर दीड ते दोन लाख सैनिक तैनात केले आहेत. युद्ध टाळता येणार नाही असे पुतिन यांनी म्हटले आहे.

पुतीन यांच्या घोषणेनंतर काही वेळातच म्हजेच आज पहाटे साडे तीन वाजता पोर्ट सिटी मारियुपोल येथे रशियन सैन्याने गोळीबारासह स्फोट केले आहेत. हे ठिकाण रशियाच्या सीमेजवळ आणि स्फोट झालेल्या ठिकाणापासून ३० मैल दूर आहे. तसेच युक्रेनची राजधानी कीवमध्ये अनेक स्फोट करण्यात आले आहेत. याशिवाय इतरही अनेक शहरांमध्ये बॉम्बस्फोट झाले आहेत. युक्रेननेही या युद्धाला प्रत्युत्तर देण्याचे आव्हान केले आहे. त्याचवेळी रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे सात जण ठार आणि नऊ जण जखमी झाले आहेत. काही तासातच रशियाने युक्रेनच्या पूर्वेकडील दोन गावांवर ताबा मिळवला आहे.

जो बिडेनसह जगभरातील नेत्यांनी या युद्धासंदर्भात प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय भारत,अमेरिका, रशियासह अनेक देशांच्या शेअर बाजारात घसरण सुरू झाली.

हे ही वाचा:

नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी

‘नवाब मलिकांना एक क्षणही मंत्रीपदावर ठेवले जाऊ नये’

ईडी कार्यालयातून बाहेर येताना नवाब मलिक आनंदी का होते?

भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल…

दरम्यान, युक्रेनमध्ये भारतीय नागरिक अद्याप अडकले आहेत. हे सर्व नागरिक भारतात लवकरात लवकर परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एका दिवसापूर्वीच २४० भारतीय नागरिक युक्रेनहून सुरक्षित भारतात दाखल झाले. काही भारतीय युक्रेन मध्ये अडकलेले आहेत त्यांना भारतीय दूतावासाने कुठेही प्रवास न करण्याचे आदेश दिले आहेत.

Exit mobile version