रशिया युक्रेन युद्धामुळे शेअर बाजार, तेलकिमतींवर विपरित परिणाम

रशिया युक्रेन युद्धामुळे शेअर बाजार, तेलकिमतींवर विपरित परिणाम

गेल्या महिनाभरापासून रशिया युक्रेनमध्ये युद्धाचे सावट होते. अखेर आज रशियाने युद्धास सुरवात केली आहे. या युद्धाचे पडसाद गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारावर तर दिसून येतच होते. मात्र आता युक्रेन-रशियाच्या युद्धामुळे भारतात मोठ्या प्रमाणात महागाई वाढू शकते.

या युद्धाचा फटका मोठ्या प्रमाणात जगभरातील शेअर बाजाराला बसला आहे. युद्धाच्या भीतीने गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मंदीचे वातावरण आहे. आज युद्धामुळे भारतीय शेअर बाजारात दहा टक्क्याहून अधिक घसरण झाली असून सेन्सेक्स २ हजार ६०० नी तर निफ्टी ८०४.२५ ने घसरला आहे.

पेट्रोल डिझेलच्या किमतीवरीही या युद्धाचा मोठा पडसाद पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. कारण भारत आपल्या गरजेच्या ८० टक्क्यांहून अधिक तेल आयात करतो. गेल्या एका महिन्यात तेलाच्या किमती १४ टक्क्यांनी वाढल्या आहेत. आज तेलाच्या किमती प्रति बॅरेल १०० डॉलरवर पोहचले आहे. परिस्थिती नियंत्रणात न राहिल्यास तेलाची किंमत प्रति बॅरल १२५ डॉलरपर्यंत पोहोचू शकते.

रशियाने युद्धाची घोषणा करताच सोन्याच्या किमतीत ८५० रुपयांनी वाढ झाली असून आज देशात सोन्याचा भाव प्रति तोळा ५३ हजार २०० झाला आहे. गव्हाच्या किमतीतही मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येत आहे. कारण एकूण जागतिक गव्हाच्या निर्यातीपैकी एक चतुर्थांश वाटा रशिया युक्रेन देशांचा आहे. रशिया हा जगातील पहिल्या क्रमांकाचा गहू निर्यातदार देश आहे, तर युक्रेन हा चौथा मोठा निर्यातदार देश आहे.

तसेच मोबाईलच्या किमतीतही वाढ होऊ शकते, कारण ऑटोमोटिव्ह एक्झॉस्ट सिस्टम आणि मोबाइल फोनमध्ये वापरल्या जाणार्‍या पॅलेडियमची या धातूची किंमत वाढली आहे. जगातील सर्वात मोठा पॅलेडियम निर्यात करणारा रशिया हा देश आहे.

हे ही वाचा:

नवाब मलिक राजीनामा द्या! भाजपाचे आंदोलन…

टिपूऐवजी राणी लक्ष्मीबाई! सत्ता तुमची, मागणी कसली करता लबाडांनो?

युद्धाच्या ठिणगीने कच्च्या तेलाचा भडका

मंत्रिपदावर राहिलेल्या व्यक्तीने मुंबई बॉम्बस्फोटातील व्यक्तीकडून जमीन का घेतली?

दरम्यान, या युद्धामुळे मॉस्को एक्सचेंजने दोन तास शेअर बाजार बंद केला होता. दोन तासानंतर ट्रेडिंग सुरु झाल्यानंतर रशियन स्टॉक सुमारे ५० टक्क्यांहून अधिक घरसले आहेत.

Exit mobile version