UNHRC मधून रशिया निलंबित

UNHRC मधून रशिया निलंबित

रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला तरीही संघर्ष सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र महासभेने रशियाला मानवाधिकार परिषदेतून (UNHRC) निलंबित केले आहे. रशियाला आयोगातून वगळण्याच्या मसुद्यावर गुरुवार, ७ एप्रिल रोजी मतदान झाले. या मतदानास भारताची अनुपस्थिती होती.

संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी मंगळवारी मानवाधिकार परिषदेसमोर रशियाला निलंबित करण्याचे आवाहन केले होते. त्यावर काल मतदान झाले. या प्रस्तावाच्या समर्थनार्थ ९३ सदस्यांनी मतदान केले आणि २४ जणांनी विरोधात मतदान केले. तर, ५७ सदस्य देश मतदानापासून दूर राहिले. भारताची अनुपस्थिती होती. मानवाधिकार परिषदेतून रशियाला काढून टाकण्याच्या बाजूने दोन तृतीयांश मतदान झाले.

बुचा येथे शेकडो नागरिक रस्त्यावर मृतावस्थेत आढळून आले होते. युक्रेनच्या बुचा येथील झालेल्या हत्येचा निषेध करत भारताने ठरावावर मतदान करणे टाळले आणि स्वतंत्र तपासाच्या आवाहनाला पाठिंबा दिला. त्यानंतर राशियाच्या या कृत्यासाठी अनेक देशांनी नाराजी दर्शवली होती. मात्र, रशियाने हे आरोप फेटाळले असून हा युक्रेनचा अपप्रचार असल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा:

इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर मतदान होणार

यशवंत जाधवांच्या ४१ मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त

ईडीची कारवाई झालेल्या संजय राऊतांचं शिवसैनिकांकडून जंगी स्वागत

विकृतीने ओलांडल्या मर्यादा! घोरपडीवर बलात्कार केल्याप्रकरणी तरुण अटकेत

अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि युरोपियन युनियनसह अनेक देशांनी युक्रेनमधील रशियाच्या लष्करी कारवायांचा निषेध केला आहे आणि मॉस्कोवर निर्बंध लादले आहेत.

Exit mobile version