युक्रेनवरील रशियाच्या रॉकेट हल्ल्यात २२ ठार

या हल्ल्यात पूर्व युक्रेनमधील गाड्या आणि इमारतींना लक्ष्य करण्यात आलं.

युक्रेनवरील रशियाच्या रॉकेट हल्ल्यात २२ ठार

युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनी रशियन सैन्याने रेल्वे स्टेशनवर रॉकेट हल्ला केला, ज्यात किमान २२ लोक ठार आणि ५० जखमी झाले. युक्रेनच्या वृत्तसंस्थांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, झेलेन्स्की यांनी व्हिडिओद्वारे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला सांगितले की, हा प्राणघातक हल्ला निप्रॉपेट्रोव्स्क प्रदेशातील चॅपल्ने शहरात झाला. शहराची लोकसंख्या सुमारे ३,५०० आहे.

रशियाने पूर्व युक्रेनवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यात पूर्व युक्रेनमधील गाड्या आणि इमारतींना लक्ष्य करण्यात आलं आहे. या क्षेपणास्त्र हल्ल्यात २२ जणांचा मृत्यू झाला असून ५० जण जखमी झाल्याचं कळतं. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी २४ ऑगस्ट रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला ही माहिती दिली “रशियाच्या सैनिकांनी निप्रॉपेट्रोव्स्क प्रदेशातील रेल्वे स्टेशनवर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात २२लोक ठार झाले आणि सुमारे ५० जखमी झाल्याचे . झेलेन्स्की यांनी सांगितलं.

झेलेन्स्की म्हणाले की, अनेक रशिया या आठवड्यात कारवाई करू शकतो असा इशारा आपण दिला हाेता. सहा महिने चाललेल्या युद्धात युक्रेनचे ९ हजार सैनिक मारले गेले आहेत, तर १५ हजार रशियन सैनिक मारले गेल्याचा अंदाज आहे. रशिया पुन्हा हल्ला तीव्र करणार असल्याची माहिती अमेरिकेने आधीच दिली होती.

हे ही वाचा:

एरंगल गावातील बेकायदा स्टुडिओ प्रकरणाची होणार सखोल चौकशी

सोनाली फोगाट यांची हत्या झाल्याचा दावा

अमोल मिटकरी हे महाराष्ट्राच्या राजकारणातील विचारांचा काळा डाग

नौशेरामधून लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटकm

रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनने बुधवारी आपला स्वातंत्र्यदिन साजरा केला. इतकेच नाही तर युक्रेनवर रशियाचा हल्ला सुरू होऊन सहा महिने पूर्ण होत आहेत. त्याच वेळी, राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर लोकांना सतर्क राहण्यास सांगितले. बुधवारी सकाळी सायरनचा आवाज ऐकून कीवमधील रहिवाशांना जाग आली. तथापि, अलिकडच्या काही महिन्यांत राजधानीत तुरळक हल्ले झाले आहेत आणि सध्या युक्रेनच्या पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील भागांमध्ये युद्ध केंद्रित आहे.

Exit mobile version