जगातील प्रसिद्ध सैनिकी आघाडी असलेल्या ‘नाटो’ मधून रशिया काढता पाय घेण्याची चिन्हे दिसत आहेत. रशियाने ‘नाटो’ सोबतचे आपले मिशन स्थगीत करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लोवारोव यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. त्यामुळे रशिया आणि इतर पश्चिम देशातील संबंध ताणले जाण्याची चिन्हे दिसत आहेत.
गेल्या आठवड्यात ‘नाटो’ या सैन्य आघाडीतील रशियाच्या आठ सदस्यांना बडतर्फ करण्यात आले. हे आठ सदस्य गुप्तचर अधिकारी असल्याचा नाटोने दावा केला आहे. हे अधिकारी गुप्तहेर म्हणून नाटोमध्ये कार्यरत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्यांना बडतर्फ करण्यात आल्याचे नाटो कडून सांगण्यात येत आहे. या कारवाईनंतर नाटो मधील रशियन अधिकाऱ्यांची संख्या ही १० वर आली आहे. तर नाटोने केलेल्या या कारवाईच्या निषेधार्थ रशियाने नाटो सोबतचे आपले मिशन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
रशियाची राजधानी असलेल्या मॉस्को शहरातील ‘नाटो’ आघाडीचे कार्यालय बंद करण्याचा निर्णय रशियन सरकारने घेतला आहे. या कार्यालयातून नाटोच्या सैन्य आणि संपर्क विभागाचे कामकाज चालत असे. तर या सोबतच नाटोच्या कार्यालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेले विशेषाधिकार आणि सवलतीही काढण्यात येणार आहेत. रशियाने हे स्पष्ट केले आहे की जर नाटोच्या अधिकाऱ्यांना रशियाशी कुठल्याही प्रकारचा संपर्क करण्याची गरज भासली तर ते बेल्जियम येथील रशियाच्या दूतावासाद्वारे संपर्क करू शकतात.
हे ही वाचा:
‘बांगलादेशी हिंदूंचे रक्षण आणि पुनर्वसन करा!’ काँग्रेस नेत्याची मागणी
मद्यपी तरुणाला सोडवण्यासाठी काँग्रेस आमदाराचे आंदोलन
आर्यन खानच्या सुटकेसाठी शिवसेना नेत्याची धडपड!
म्हाडासाठी अर्ज करताय? मग तुम्ही मांसाहारी की शाकाहारी ते सांगा
काय आहे नाटो?
नाटो (NATO) अर्थात नॉर्थ ऍटलाण्टिक ट्रीटी ऑर्गनाइज़ेशन ही एक सैनिकी आघाडी असून त्याची स्थापना ४ एप्रिल १९४९ रोजी झाली. या आघडीचे मुख्यालय बेल्जिअम येथे आहे. या आघाडीत एकूण ३० सदस्य देश आहेत.