रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची प्रकृती ठीक नसल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान, ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा MI6 च्या प्रमुखांनी एक मोठा आणि धक्कादायक दावा केला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा गंभीर आजाराने आधीच मृत्यू झाला असून त्या ठिकाणी त्यांच्यासारखीच दिसणारी व्यक्ती काम करते असा दावा करण्यात आला आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ युद्ध सुरू आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुतीन यांची तब्येत बिघडल्याच्या चर्चा होत्या. त्यांना कॅन्सर झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे पुतीन यांचा गंभीर आजारामुळे मृत्यू झाला असू शकतो असा दावा ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा MI6 च्या प्रमुखांनी केला आहे.
पुतीन यांचा मृत्यू झाल्याची बातमी आता समोर आल्यास जगभरात एकच खळबळ उडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच त्यांच्यासारखाच दिसणारा, देहबोली असणाऱ्या व्यक्तीकडून राज्यकारभार चालवला जात असल्याचा दावा MI6 च्या प्रमुखांनी केला आहे. याबाबत ब्रिटनच्या ‘मिरर’ संकेतस्थळाने ‘द डेली स्टार’च्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
हे ही वाचा:
नेपाळमधील त्या बेपत्ता विमानात ठाण्याचे चार प्रवासी
पदर्पणाच्या हंगामतच गुजरात टायटन्सने आयपीएलच्या विजेतेपदावर कोरलं नाव
शहीद प्रशांत जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार; विधवा प्रथेला मूठमाती
पंतप्रधान मोदींनी सांगितली ही योग दिनाची थीम
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना कॅन्सर असल्याचं मध्यंतरी सांगितलं जात होतं. त्यावरील उपचारासाठी ऐन युद्धाच्या काळात पुतीन हे सुट्टीवर जाणार होते. पुतीन यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. दरम्यान, रशियाने या बाबत कोणतीही अधिकृत घोषणा वा माहिती दिलेली नाही.