युक्रेनवर ७५ क्षेपणास्त्रांचा मारा, शेकडो ठार

रशियाने केला आत्मघातकी हल्ला

युक्रेनवर ७५ क्षेपणास्त्रांचा मारा, शेकडो ठार

युक्रेनची राजधानी कीव यासह अनेक शहरामध्ये जीव दडपून टाकणारे क्षेपणास्त्रांचे आवाज अणि जो रदार स्फोटांनी  युक्रेनची राजधानी कीव यासह अनेक शहरे हादरून गेली आहेत. या स्फोटात शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा अधिकृत आकडा अद्याप समोर आला नाही. पण मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. अनेक शहरांतील इमारतींमधून काळ्या धुराचे लोट बाहेर येताना दिसत आहेत . रशियाने युक्रेनवर हल्ला करण्यासाठी १२ आत्मघाती इराणी ड्रोन पाठवले असल्याचं म्हटल्या जात आहे.


राजधानी कीववर ७५ क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले आहेत. त्यापैकी ४१ क्षेपणास्त्र युक्रेनच्या हवाई दलाने पाडले आहेत. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या कार्यालयावरही क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे .

शेवचेन्स्कीव्हस्की जिल्ह्यात जास्त स्फोट झाले आहेत. हा भाग राजधानी कीवच्या मध्यभागी आहे असं कीवचे महापौर विटाली क्लित्स्को यांनी म्हटलं आहे. एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी ८.१५ च्या सुमारास हा स्फोट झाला. युक्रेनच्या राजधानीत हवाई हल्ल्याच्या सायरन्सचा आवाज एक तासापेक्षा जास्त काळ चालला.

हे ही वाचा:

निवडणूक आयोगाविरुद्ध ठाकरे गटाची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

शिंदे गट ‘या’ तीन चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवणार

ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंविरोधात गुन्हा दाखल

चिन्हं, नाव गोठवल्यावरही ठाकरेंचे गद्दार, खोकासूर, मिंधे गट सुरूच

अनेक ठिकाणी बचाव पथक पोहोचले

कीवमधील आपत्कालीन सेवेच्या प्रवक्त्याने सांगितले की अनेक लोक जखमी झाले आहेत आणि शेकडो मृत्यू झाले आहेत. बचाव पथके आता वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत झाले आहेत. कारण लिव्ह, टेर्नोपिल, खमेलनित्स्की, झायटोमिर आणि क्रोपिव्हनित्स्की येथेही स्फोट झाले होते.

 

आम्हाला पृथ्वीवरून नामशेष करण्याचा प्रयत्न

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की संपूर्ण युक्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये अनेक लोक ठार आणि जखमी झाले आहेत. झेलेन्स्की म्हणाले की रशियन आम्हाला नष्ट करण्याचा आणि पृथ्वीतलावरून आम्हाला पुसण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Exit mobile version