रशियाच्या हल्ल्यात हॉस्टोमेलचे महापौर ठार

रशियाच्या हल्ल्यात हॉस्टोमेलचे महापौर ठार

रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनमधील हॉस्टोमेलचे महापौर ठार झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरु आहेत. यामध्येच रशियाने केलेल्या भीषण गोळीबारात महापौरांना जीव गमवावा लागला आहे.

हॉस्टोमेलचे महापौर युरी प्रिलिपको यांच्या निधनानंतर शहरात खळबळ उडाली आहे. त्यांच्यासोबत इतर दोन जण ठार झाले आहेत. तर युक्रेनच्या विनितसियामधील विमानतळावर हवाई हल्ल्यात नऊ जण ठार झाले आहेत. यापूर्वी कीवपासून २६ किमी अंतरावर असलेल्या इरपिन शहरातून बाहेर काढण्याच्या मार्गावर मोटार डागल्याने एक आई आणि तिची तीन मुले ठार झाली आहे. युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर खारकीव येथे एक जण ठार तर पाच जण जखमी झाले, तर रशियन हवाई हल्ल्यात एका निवासी इमारतीवर हल्ला करण्यात आला आहे.

युक्रेनियन सैन्य मॉस्कोच्या पाठिंब्याने पूर्वेकडील डोनबासमध्ये रशियन सैन्याशी जोरदार लढाईत गुंतले आहे. युक्रेनचे उप संरक्षण मंत्री हन्ना मलयार यांनी सांगितले की युक्रेनचे सैन्य डोनबासच्या दोन बंडखोर शहरांमध्ये लढत होते जेथे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी २४ फेब्रुवारी रोजी लष्करी कारवाईची घोषणा केली होती.

हे ही वाचा:

… म्हणून भारतीय महिलांचं होतंय कौतुक!

‘नेत्यांच्या गाडीवर चप्पलफेक करणाऱ्यांवर कोणता गुन्हा दाखल करणार आहात?’

४३४; फिरकीपटू अश्विनकडून कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी

युक्रेनने पंतप्रधान नरेंद्र मोदींना का घातले साकडे?

कीव जवळ रशियन सैन्याने मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि सैन्य जमा केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत रशियन सैन्य कीववर ताबा मिळवण्याची शक्यता आहे. अशी माहिती युक्रेनच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.

Exit mobile version